For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पक्षातील खासदार का सोडून गेले, याचे उत्तर द्यावे

04:14 PM Jun 19, 2026 IST | अनुजा कुडतरकर
पक्षातील खासदार का सोडून गेले  याचे उत्तर द्यावे
Advertisement

ऑपरेशन टायगरवरून मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Advertisement

कणकवली : ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत पक्षातील खासदार का सोडून गेले, याचे उत्तर त्यांनी द्यावे असे म्हटले आहे.तृणमूल काँग्रेसमध्ये जसा अभिषेक बॅनर्जी आहे, तसाच उबाठामध्ये आदित्य ठाकरे आहे. ‘ऑपरेशन टायगर’बाबत बोलण्यापूर्वी याचा जबाबदार कोण, याचाही विचार झाला पाहिजे. आदित्य ठाकरे असताना त्यांच्या पक्षातील खासदार का सोडून गेले, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या तयारीत होता, अशी भीती अनेक खासदारांना वाटत होती. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा स्वीकार केला, असा दावा राणे यांनी केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसविरोधी विचारांवर शिवसेना उभी केली होती. मात्र त्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरे काँग्रेसच्या जवळ गेले, असा आरोप त्यांनी केला.संजय राऊत यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा आधी आत्मपरीक्षण करावे. शिवसेनेने घेतलेली भूमिका ही बाळासाहेबांच्या विचारांना न्याय देण्यासाठी आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत राणे म्हणाले की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा आता काहीही संबंध राहिलेला नाही.

Advertisement
Advertisement
Tags :

.