कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोप निवड प्रक्रिया आजपासून सुरू होणार

06:53 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

71 देशांचे 133 कार्डिनल्स घेणार भाग : क्षेत्रीय प्राथमिकतांचा होणार प्रभाव

Advertisement

वृत्तसंस्था/ व्हॅटिकनल सिटी

Advertisement

नव्या पोपच्या निवडीसाठी बुधवारपासून कॉन्क्लेव सुरू होणार आहे. जगभरातील 140 कोटी कॅथोलिकांच्या नव्या पोपची निवड भौगोलिक विविधतेच्या दृष्टीकोनातून ऐतिहासिक ठरणार आहे. सध्या 71 देशांमध्ये 80 वर्षांपेक्षा कमी वयाचे 135 कार्डिनल्स असून यातील दोन जणांनी आरोग्याच्या कारणास्तव मतदानात भाग घेण्यास नकार दिला आहे. म्हणजेच आता 133 कार्डिनल्स निवडणुकीत भाग घेतील आणि बहुमतासाठी दोन तृतीयांश म्हणजेच 89 मतांची गरज भासणार आहे.

इटलीत सर्वाधिक 17 कार्डिनल्स आहेत, तर अमेरिकेत 10, ब्राझीलमध्ये 7, फ्रान्स आणि स्पेनमध्ये प्रत्येकी 5, अर्जेंटीना, कॅनडा, भारत, पोलंड आणि पोर्तुगालमध्ये प्रत्येकी 4 कार्डिनल्स आहेत. आता या कार्डिनल्सना क्षेत्रानुसार विभागल्यास व्हॅटिकनच्या आकडेवारीनुसार युरोपचे 53 कार्डिनल्स आहेत, यातील एक आजारी असल्याने मतदानात 52 जण भाग घेतील. यानंतर आशियातील 23 कार्डिनल्स मतदानात सहभागी होतील. तर आफ्रिकेतील 18 पैकी एका कार्डिनल्सची प्रकृती बिघडल्याने 17 जण मतदान करतील. दक्षिण अमेरिकेचे 17, उत्तर अमेरिकेचे 16, मध्य अमेरिकेचे 4 आणि ओसियनियाचे 4 कार्डिनल्स आहेत.

कार्डिनल्सच्या प्राथमिकता त्यांच्या क्षेत्रानुसार वेगवेगळ्या असणार आहेत. कार्डिनल्सच्या मतदानात भौगोलिक प्राथमिकतांचे प्रतिबिंब दिसून येऊ शकते. परंतु जगातील या सर्वात गुप्त मतदानात कुणी कुणाला मतदान केले हे कुणालाच कळू शकणार नाही. कॉन्क्लेवपूर्वी सोमवारपासूनच कार्डिनल्सच्या साहाय्यक कर्मचाऱ्यांनी पॉलीन चॅपेलमध्ये गोपनीयतेची शपथ घेण्यास सुरुवात केली आहे. यात चिकित्सक, नर्स, आचारी, लिफ्ट चालक, सफाई समवेत अन्य आवश्यक कामांशी निगडित कर्मचारी सामील आहेत. हे सर्व कर्मचारी कॉन्क्लेवदरम्यान बाहेर जाऊ शकणार नाहीत. या शपथेचे उल्लंघन केल्यास थेट चर्चमधून त्याची हकालपट्टी केली जाणार आहे. तर बुधवारपासून सिस्टीन चॅपेलमध्ये कार्डिनल्स शपथ घेत कॉन्क्लेवची सुरुवात करतील.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article