महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विरोधक पंतप्रधानांना पत्र लिहिणार

10:48 AM Nov 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नोकरी घोटाळाप्रकरणे विरोधी आमदार एकवटले : पात्र उमेदवारांवरील अन्याय दूर करण्याची गरज

Advertisement

मडगाव : लोकसभा निवडणुकीनंतर काहीसा दुरावा निर्माण झाल्याचे चित्र असलेले विरोधी पक्षांचे आमदार काल मंगळवारी ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात पुन्हा एकदा एकत्र आले. त्यांनी गोव्यातील ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. काल मडगावात झालेल्या या बैठकीला काँग्रेस आमदार युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता, कार्लुस परेरा, आपचे आमदार व्हिन्झी व्हियेगस व व्रुझ सिल्वा आरजीपीचे आमदार विरेश बोरकर आणि गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई हे सर्व सात विरोधी आमदार एकत्र उपस्थित होते.

Advertisement

पोलिसांचे ‘फिशनेट’ खराब

गोवा पोलिस ज्या प्रकारे तपास करत आहेत आणि भाजपच्या मंत्र्यांना ‘क्लीन चीट‘ प्रमाणपत्रे देत आहेत ते धक्कादायक आहे. आम्हाला माहीत आहे की, त्यात सामील असलेले ‘मोठे मासे’ पोलिसांच्या खराब झालेल्या फिशनेटद्वारे पकडले जाणार नाहीत. पोलिस भाजपचे प्रवत्ते झाले आहेत, असे युरी आलेमाव या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

तो भाजपच्या मंत्र्याचा कर्मचारी?

काल म्हार्दोळ पोलिसांनी ज्याला अटक केली तो भाजपच्या एका मंत्र्याचा कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. नोकऱ्या विकून पैसे कमवण्यासाठी मंत्र्यांनी असे अनेक एजंट ठेवलेले असू शकतात. त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यामुळे हा गंभीर विषय असल्याने आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे, असे युरी आलेमाव म्हणाले. जर अपात्र उमेदवारांनी भाजपच्या दलालांना लाच देऊन सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या, तर भ्रष्टाचार करणाऱ्यांकडे खाती कशी चालणार? भविष्यात ते नोकरी मिळवण्यासाठी खर्च केलेले पैसे वसूल करण्यासाठी लोकांकडून लाच घेतील. त्यामुळे भ्रष्टाचाराचे चक्र असेच सुरू राहणार आहे असल्याचे मतही बैठकीत व्यक्त झाले.

साखळी तोडण्यासाठी पोलिसांचा वापर

आता त्यांचा सहभाग उघड झाल्याने तपासाची साखळी तोडण्यासाठी भाजप सरकार पोलिस अधिकाऱ्यांचा वापर करत आहे. सत्तेत असलेल्या राजकारण्यांना पोलिस क्लीन चीट देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ते भाजपचे प्रवत्ते असल्याचे पोलिस सिद्ध करत आहेत.

तपास झालेला नसताना ‘क्लीन चीट’ कशी देता?

गुन्हे दाखल होत असताना पोलिस निष्कर्षावर कसे जाऊ शकतात? सर्व प्रकरणांचा तपास संपला का ? आमदार आणि इतर दलालांचे व्हायरल होणारे ऑडिओ त्यांनी तपासले आहेत का ? पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे का ? मग ते सत्तेत असलेल्या राजकारण्यांना क्लीन चीट कशी देतात?, असे सवाल करुन या एजंटांनी किती उमेदवारांना नोकऱ्या दिल्या आहेत, हे पोलिसांनी तपासले आहे का? मला खात्री आहे की पोलिस असे करणार नाहीत कारण त्यांना त्यांच्या बॉसचे संरक्षण करायचे आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

खाणबंदी, बेरोजगारीला भाजप जबाबदार

खाणकाम पुन्हा सुरू करणे आणि रोजगार निर्मिती ही भाजपच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख आश्वासने होती. 2012 मध्ये भाजपने बेरोजगारी दूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले? असा सवालही बैठकीत उपस्थित करण्यात आला. खाणबंदी आणि त्यामुळे वाढलेली बेरोजगारी याला भाजप जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article