For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात आज एकच नारा ‘चलो शिनोळी’

10:46 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात आज एकच नारा ‘चलो शिनोळी’
Advertisement

मंडोळी, हंगरगा, सावगाव भागात रास्तारोको संदर्भात जनजागृती : उपस्थित राहण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार

Advertisement

वार्ताहर /किणये

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवार दि. 4 रोजी सकाळी टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महामेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तसेच 144 कलम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सीमा भागातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवारी शिनोळी येथे रास्तारोको आयोजित केला आहे. त्यामुळे आता तालुक्यात सोमवारी एकच नारा ‘चलो शिनोळी’ दिसून येणार आहे कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने दरवर्षी महामेळाव्याचे आयोजन करून आपला विरोध दर्शविण्यात येतो. यंदाही या महामेळाव्याचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने याला परवानगी नाकारली. कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून व्हॅक्सिंन डेपो टिळकवाडी येथील महामेळावा रद्द करून शिनोळी येथे  रास्तारोको करण्याचे समितीच्या नेते मंडळींनी ठरवले आहे.

Advertisement

रास्ता रोको संदर्भात रविवारी मंडोळी, हंगरगा, सावगाव, बेनकनहळ्ळी या भागात जनजागृती करण्यात आली आहे. कर्नाटक सातत्याने सीमा बांधवांवर अन्याय, अत्याचार करीत आहे. गेल्या 66 वर्षापासून सीमा प्रश्नाची लढाई सुरू आहे. सीमा भागातील नागरिक महाराष्ट्रात सामील होण्यासाठी धडपडत आहेत. अनेक आंदोलने करीत करीत आहेत. सर्वकाही लोकशाही मार्गाने सुरू आहे.बेळगावमध्ये कर्नाटकचे अधिवेशन भरविण्यात येत आहे. या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने रास्तारोकोचे आयोजन करण्यात आले आहे. सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी अनेक आंदोलने झालेली आहेत. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अनेकांनी रक्त सांडले आहे. कित्येक जणांनी तुरुंगवास भोगला आहे सीमाप्रश्नाचा खटला न्यायालयात आहे. या सीमाप्रश्नाला अधिक बळकटी देण्यासाठी रस्त्यावरील लढाई सुरूच ठेवावी लागणार आहे. यासाठी प्रशासन कितीही सीमा बांधवांवर अन्याय, अत्याचार करीत असले तरी सीमा बांधवांची एकजूट कदापिही कमी पडणार नाही असा ठाम निर्धार पश्चिम भागातील सीमा बांधवांनी केला आहे. त्यामुळेच सोमवारी सकाळी तालुक्याच्या विविध भागातून हजारोंच्या संख्येने शिनोळी येथे रास्तारोकोसाठी उपस्थित राहण्याचा निर्धार केला आहे.

Advertisement
Tags :

.