For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

25 सप्टेंबरला झळकणार ‘द वन’

06:46 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
25 सप्टेंबरला झळकणार ‘द वन’
Advertisement

तमन्ना भाटिया, सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत

Advertisement

बहुप्रतीक्षित चित्रपट ‘द वन’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटियाच हा चित्रपट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. चित्रपटाची कहाणी छठी मइया आणि बिहारच्या द वन देवी मंदिराच्या अवतीभवती घुटमळणारी आहे.

चित्रपटाची कहाणी शहरात लहानाचा मोठा झालेल्या इसमाची (सिद्धार्थ मल्होत्रा) असून तो स्वत:च्या मूळ गावी जाणे टाळत असतो. परंतु त्याचा भाऊ (अनूप सोनी) त्याला छठवेळी घरी येण्यास सांगतो. त्याची पत्नी देखील (तमन्ना भाटिया) देखील छठनिमित्त गावी जाण्याचा हट्ट करते. जेव्हा हा इसम मूळ गावी पोहोचतो, तेव्हा त्याला वन देवी मंदिराच्या रहस्याबद्दल कळते. कधी विकासासाठी जंगल तोडणारा इसम त्याच जंगलाचा रक्षक होतो. चित्रपटाचा ट्रेलर दमदार असून यात कॉमेडी, भय अन् मॅथोलॉजीचा मिलाप आहे.

Advertisement

अनुरभ कुमार आणि दीपक कुमार मिश्रा यांच्या दिग्दर्शनात तयार चित्रपट द वन हा 25 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सिद्धार्थ, तमन्ना यांच्यासोबत अनूप सोनी, श्वेता तिवारी, सुनील ग्रोवर आणि मनीष पॉल यासारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Advertisement
Tags :

.