पृथ्वीवर शोधलेली सर्वात जुनी गोष्ट
किंमत कळल्यावर बसेल धक्का
पृथ्वीवर मानवी जीवन अब्जावधी वर्षांपूर्वी सुरू झाले होते. परंतु या वर्षांमध्ये एखादी अशी गोष्ट आहे जी पृथ्वीवर सर्वात जुनी आहे याचा कधी विचार केला आहे का? वैज्ञानिनकांना अलिकडेच एक निळ्या रंगाची चमक असणारा जिरकॉन क्रिस्टल मिळाला आहे. हा क्रिस्टल सुमारे 4.4 अब्ज वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येते. आता पृथ्वीचे 4.54 अब्ज वर्षे जुनी असल्याचे मानले जाते.
हा क्रिस्टल पृथ्वीवर शोधण्यात आलेली सर्वात जुनी गोष्ट असल्याचा दावा करण्यात येतो. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या एका पर्वतात याचा शोध लागला होता. याला जॅक हिल्स नावाने ओळखले जाते. याला शोधल्यावर वैज्ञानिकांनी या दगडावर संशोधन पेले जाते, ज्यात हा जवळपास 4.39 अब्ज वर्षे जुना असल्याचा खुलासा झाला. जिरकॉन क्रिस्टल प्रत्यक्षात जिरकॉनियन सिलिकेटचे क्रिस्टल असतात, जे निळ्या रंगाची चमक सोडत असतात. हे क्रिस्टल अब्जावधी वर्षांपर्यंत एकसारखेच राहतात. याचबरोबर दबाव आणि अधिक तापमान सहन करण्यास हे सक्षम असून यात कधीच बदल होत नाही.