For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडोनेशियात सर्वात जुनी रॉक आर्ट

06:53 AM Feb 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंडोनेशियात सर्वात जुनी रॉक आर्ट
Advertisement

गुहेत 67800 वर्षांपूर्वी पोहोचला होता माणूस

Advertisement

इंडोनेशियाच्या सुलावेसीच्या किनाऱ्यावर एका गुहेत पुरातत्वतज्ञांनी माणसांच्या हजारो वर्षांपूर्वीच्या रहस्याची उकल करणारा शोध लावला आहे. पुरातत्वतज्ञांच्या टीमने एका चुनादगडाच्या गुहेच्या भिंतीवर माणसांकडून निर्मित रॉक आर्ट शोधले आहे. याला आतापर्यंत शोधण्यात आलेले सर्वात जुने रॉक आर्ट मानले गेले आहे. यामुळे माणूस पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसे स्थलांतरित झाले होते हे कळत असल्याचे पुरातत्वतज्ञांनी सांगितले आहे. इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या पुरातत्वतज्ञांच्या एका टीमच्या अध्ययनाला नेचर नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहे. यात गुहेत शोधण्यात आलेली ही कला कमीतकमी 67,800 वर्षे जुनी असल्याचे म्हटले गेले आहे. टोकदार बोटं असलेल्या हातांनी निर्मित लाल स्टेंसिलद्वारे हजारो वर्षांपूर्वी या क्षेत्रात माणसांच्या प्रारंभिक स्थलांतराविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते. अध्ययनाचे सह-लेखक आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ युनिव्हर्सिटीचे पुरातत्वतज्ञ मॅक्सिम ऑबर्ट यांनी इंडोनेशियात आम्ही जे पाहत आहोत, ते एकह अत्यंत जुन्या सांस्कृतिक परंपरेचा खुलासा असल्याचे म्हटले आहे.

हजारो वर्षांपूर्वी पोहोचला होता माणूस

Advertisement

आम्ही दीर्घकाळापासून येथे काम करत आहोत. यावेळी टीमने सुलावेसी प्रांतात मूना बेटाच्या गुहांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. येथे मिळालेल्या रॉक आर्टचे प्रमाण आणि त्याचा कालखंड पाहता हे काही किरकोळ किंवा अस्थायी ठिकाण नव्हते हे स्पष्ट होते. हे एक सांस्कृतिक केंद्र होते, जेथे प्रारंभिक माणूस राहायचे, प्रवास करायचे आणि हजारो वर्षांपर्यंत कलेच्या माध्यमातून स्वत:च्या विचारांना प्रकट करत होते असे ग्रिफिथ यांनी सांगितले आहे.

हातांनी साकारले रॉक आर्ट

संशोधकांनी स्टेंसिलयुक्त हातांच्या खुणा मिळाल्या असून त्यांना बहुधा लाल गेरूचा वापर करत तयार करण्यात आले होते. एका हाताच्या बोटांना अशाप्रकारे तयार करण्यात आले होते की जेणेकरून ते पंज्यांप्रमाणे टोकदार होतील. रॉक पेंटिंगची ही स्टाइल केवळ सुलावेसीत दिसून आली आहे. हे स्टेंसिल स्पेनच्या गुहेत मिळालेल्या हाताच्या स्टेंसिलपेक्षा हजार वर्षांपेक्षा अधिक जुने असल्याचे अध्ययनात म्हटले गेले आहे.

अलिकडच्या वर्षांमध्ये इंडोनेशियाचे सुलावेसी आणि बोर्नियो क्षेत्र प्रारंभिक मानवी मायग्रेशनला समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठिकाण ठरले आहे. अनेक गुहांमधील पेंटिंग्ज दशकांपूर्वी शोधण्यात आली होती, परंतु डेटिंग तंत्रज्ञानात विकासामुळे वैज्ञानिकांना आता त्यांच्या योग्य कालखंडाचा शोध लागत आहे. याचे किमान वय 40 हजार वर्षांपेक्षा अधिक असून 51 हजार वर्षांच्या पुढेही जात असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.