महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्ह्यातील लघुउद्योगांची संख्या वाढती

11:19 AM Dec 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोरोनानंतर नवीन दहा हजार उद्योगांची भर : सध्या जिल्ह्यात 77 हजार 257 लघुउद्योग कार्यरत

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लघुउद्योग आहेत. यामध्ये अन्नप्रक्रिया व कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा सर्वाधिक समावेश आहे. मध्यंतरी लघुउद्योगांची संख्या काही कारणाने कमी झाली होती. परंतु, सध्या ही संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात 77 हजार 257 लघुउद्योग कार्यरत असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्रातून उपलब्ध झाली आहे.

Advertisement

2020 मध्ये कोरोना महामारीमुळे बरेच उद्योग बंद झाले. सलग दोन वर्षे कोरोनाचा प्रभाव जाणवल्याने वेळेत कर्ज भरता न आल्याने अनेक उद्योगांनी शटर बंद केले. त्यावेळेला बेळगावमधील 600 ते 700 लघुउद्योग व मोठे उद्योग बंद झाले होते. याचा परिणाम रोजगारावर झाल्याचेही दिसून आले. परंतु, त्यानंतर परिस्थिती सुधारत गेली आणि उद्योगांना गती मिळत गेली. कोरोनानंतर अनेक नवे उद्योग सुरू झाले. बेळगाव शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात लहान औद्योगिक वसाहती सुरू झाल्यामुळे रोजगार निर्मिती होत गेली.

2021 मध्ये जिल्ह्यातील लघुउद्योगांची संख्या 66,455 होती. ती 2023 अखेरपर्यंत 77,257 वर पोहोचली. अवघ्या दोन वर्षांमध्ये दहा हजार नवे उद्योग वाढल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. एमएसएमईअंतर्गत या उद्योगांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे. लघुउद्योगांमध्ये लोखंडाच्या वस्तू तयार करण्यापासून मोठ्या वस्तू तयार करण्यापर्यंत समावेश होतो. बेळगाव जिल्हा हा दूध व कृषी उत्पादनात अग्रेसर असल्याने मोठ्या प्रमाणात प्रक्रिया उद्योगही याठिकाणी सुरू आहे. दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया करून ते बाजारपेठेत आणले जात आहेत. यामुळे चांगल्या प्रकारे रोजगार निर्मितीही होत आहे.

शहरालगत औद्योगिक वसाहतीची गरज

बेळगाव शहराला लागून उद्यमबाग येथे यापूर्वी औद्योगिक वसाहत होती. परंतु, शहराचा विस्तार होत गेला आणि औद्योगिक वसाहतीपर्यंत रहिवासी वसाहती झाल्या. यामुळे उद्योगांचा विस्तार खुंटला आहे. त्यामुळे वाघवडे रोड, मच्छे रोड, नावगे रोड, किणये रोड, अनगोळ, मजगाव या परिसरात जागा मिळेल तेथे उद्योग सुरू करण्यात आले. याऐवजी शहरालगतच एखादी नवीन औद्योगिक वसाहत सुरू झाल्यास लघुउद्योगांसह मध्यम उद्योग सुरू करणे सोयीचे होणार आहे.

कर्जपुरवठा करण्यासाठी डीआयसीमार्फत मदत 

बेळगाव जिल्ह्यात लघुउद्योगांना पोषक वातावरण असल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उद्योगांना विविध योजनांमधून कर्जपुरवठा करण्यासाठी डीआयसीमार्फत मदत केली जात आहे.

- सत्यनारायण भट, (सहसंचालक जिल्हा उद्योग केंद्र)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article