For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2050 पर्यंत दुप्पट होणार वृद्धांची संख्या

06:41 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
2050 पर्यंत दुप्पट होणार वृद्धांची संख्या
Advertisement

युएनएफपीए इंडिया प्रमुखांनी दिली माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या विभागाच्या भारताच्या शाखेच्या प्रमुख एंड्रिया वोजनार यांनी भारतातील वृद्धांची संख्या 2050 पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता असल्याचे म्ह्टले आहे. देशात आता एकट्याने राहण्याची किंवा गरीबीला तोंड देण्याची वेळ येऊ शकणाऱ्या वृद्धांसाठी आरोग्य सेवा, घर आणि पेन्शनसाठी अधिक गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Advertisement

भारत निरंतर विकासाचे लक्ष्य गाठण्याला प्राथमिकता देत आहे. यात युवा लोकसंख्या, वृद्ध लोकसंख्या, शहरीकरण स्थलांतर आणि हवामानानुसार बदल करणे सामील आहे. हे घटक देशासाठी अनोखी आव्हाने आणि संधी निर्माण करतात. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांची संख्या 2050 पर्यंत दुप्पट होत 34 कोटी 60 लाखावर पोहोचण्याचा अनुमान आहे. याचमुळे आरोग्य सेवा, निवारा आणि पेन्शन योजनांमधील गुंतवणूक वाढविण्याची नितांत गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

भारतात सध्या युवा लोकसंख्या अधिक आहे. देशात 10-19 वयोगटातील लोकांची संख्या 25 कोटी 20 लाख इतकी आहे. लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासोबत आरोग्य, शिक्षण आणि नोकरीसाठी प्रशिक्षण तसेच रोजगार निर्मितीत गुंतवणूक केल्याने या लोकसांख्यिकीय क्षमतेचा लाभ  घेता येणार आहे. तसेच देशाला निरंतर प्रगतीच्या दिशेने अग्रेसर ठेवता येईल. भारतात 2050 पर्यंत शहरी लोकसंख्येचे प्रमाण 50 टक्क्यांवर पोहोचण्याचा अनुमान आहे. याचमुळे झोपडपट्ट्यांमधील वाढ, वायू प्रदूषण आणि पर्यावरणीय समस्यांना सामोरे जाण्यासाठी स्मार्ट शहरे, मजबूत पायाभूत सुविधा आणि परवडणाऱ्या घरांची निर्मिती महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शहरी योजनांमध्ये महिलांच्या सुरक्षेसंबंधी गरजा, आरोग्य देखभाल आणि शिक्षण तसेच नोकऱ्यांपर्यंत पोहोच देखील विचारात घेतली जावी, जेणेकरून लैंगिक समानतेला चालना देता येईल आणि जीवनाच्या समग्र गुणवत्तेत सुधारणा होऊ शकेल. अंतर्गत आणि बर्हिगत स्थलांतराचे व्यवस्थापन करण्यासाठी विचारपूर्वक योजना तयार करणे, कौशल्य विका आणि आर्थिक संधीच्या वितरणाची आवश्यकता असते. हवामान बदलानुसार विकासयोजनांमध्ये बदल करणे आणि नुतनीकरणीय ऊर्जेत गुंतवणूक करणे भारतासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे वोजनार म्हणाल्या.

Advertisement
Tags :

.