For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुष्काळी तालुक्यांची संख्या 200 पर्यंत शक्य

06:22 AM Sep 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुष्काळी तालुक्यांची संख्या 200 पर्यंत शक्य
Advertisement

सप्टेंबर अखेरपर्यंत घोषणा होणार : मंत्री ईश्वर खंडे यांची माहिती

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेंगळूर  

एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत 180 ते 200 तालुके दुष्काळग्रस्त घोषित होण्याची शक्यता आहे, असे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री ईश्वर खंडे यांनी सांगितले.

Advertisement

बेंगळूरमध्ये शनिवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री ईश्वर खंड्रे यांनी, राज्य सरकारने यापूर्वीच 101 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. लवकरच 24 ब्लॉकना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्याची तयारी सुरू आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत होणाऱ्या आणखी एका प्रत्यक्ष सर्वेक्षणात हा आकडा 180 ते 200 पर्यंत वाढेल, असे सांगितले.

राज्यात 2026 चा मान्सून, दुष्काळड परिस्थिती आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा आढावा घेण्यासाठी तसेच प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी धोरणे व आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यासाठी महसूल मंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मी या उपसमितीचा सदस्य असून शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत आणखी तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंबंधी विस्तृत चर्चा झाली, असे ते म्हणाले.

अतिरिक्त भरपाईबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील

कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी एनडीआरएफ अंतर्गत नुकसान भरपाई दिली जाईल. याशिवाय, राज्यात ज्या भागांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्या भागांना अतिरिक्त नुकसान भरपाई देण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या 101 ब्लॉक्ससाठी 2600 कोटी रुपये द्यावेत, अशी  राज्याची केंद्र सरकारकडे मागणी आहे, असे मंत्री ईश्वर खंड्रे यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता, राज्यातील भाजप खासदार आणि नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारवर निधी उपलब्ध करून देण्याकरिता दबाव आणला पाहिजे. परंतु, पदयात्रेचे निमित्त करून वेळकाढूपणा करत आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

Advertisement
Tags :

.