महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोव्यात मधुमेहींची संख्या चिंताजनक

12:04 PM Nov 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्वाधिक मधुमेही गोव्यात : सहा वर्षांत सहा हजार मृत्यू,आज जागतिक मधुमेह दिन

Advertisement

पणजी : राज्यात गेल्या सहा वर्षांत मधुमेहामुळे 6 हजार 121 जणांचा मृत्यू झालेला आहे. या आजारामुळे सरासरी दिवसाला तीन मृत्यूंची नोंद राज्यात होताना दिसत आहे. तसेच या आजाराचे प्रमाण महिलांपेक्षा पुऊषांमध्ये अधिक असल्याचे राज्य सरकारने जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे. अहवालानुसार, गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत 3 हजार 459 पुऊष, तर 2 हजार 662 महिलांचा मृत्यू झाला असून, सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक असल्याचेही जाणवते.

Advertisement

देशात सर्वाधिक मधुमेही गोव्यात

भारतात मधुमेहाच्या ऊग्णांची संख्या पुन्हा एकदा जगात सर्वाधिक झाली असून, देशातील मधुमेहाच्या ऊग्णांची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे. देशभरात गोव्यात या ऊग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती युके मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली असून, हा अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) तयार केला आहे. देशातील काही विकसित राज्यांमध्ये मधुमेहाच्या ऊग्णांची संख्या स्थिर होत आहे तर काही राज्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अनेक पटींनी वाढत आहे. देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात मधुमेहाच्या ऊग्णांची संख्या खूपच कमी आहे तर लोकसंख्येच्या तुलनेत सर्वांत लहान असलेल्या गोव्यात मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. मधुमेहाच्या ऊग्णांमध्ये मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. खाण्याच्या सवयी बदलणे, यासोबतच दररोज व्यायाम करणे, मधुमेह प्रमाण जास्त असले तर डॉक्टराचा सल्ला घेऊन गोळ्या किंवा इन्सुलीन घेणे आवश्यक आहे. तसेच जीवनशैलीतील बदल, औषधोपचार, व्यायम, आणि काही उपचार पद्धतींच्या मदतीने मधुमेहाचे सुऊवातीच्या टप्प्यातच काळजी घेऊन यशस्वीपणे नियोजन केले जाऊ शकते.

गोव्यात सहा वर्षांच्या मधुमेहाचा आढावा

मधुमेहाचे योग्य नियोजन आवश्यक

मधुमेहाचा संबंध वाढत्या शहरीकरणाशी, अस्वास्थ्य, आहाराची पद्धत आणि त्यानंतर बैठी जीवनशैली, लठ्ठपणा आणि अनुवंशिक या सगळ्यांशी जोडलेला आहे. तरीसुद्धा गोवा हे सुशिक्षित राज्यांपैकी एक असल्याने आज लोक यावर उपचार घेण्यास पुढे येताना दिसतात. तसेच लोकांना निरोगी राहण्याचे महत्त्व देखील समजले आहे. गोव्यात आज सरकारी आणि खासगी आरोग्य सेवा क्षेत्रात मजबूत आरोग्यसेवा, सुविधा आहेत. त्यामुळे गोव्यातील लोकसंख्येमध्ये मधुमेहाचे योग्य आणि पुरेसे व्यवस्थापन करून दर कमी करण्यास मदत होईल.

- डॉ. चेतन कारेकर, पोलीस सर्जन, गोमॅको

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article