कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डिमॅट खात्यांची संख्या 4 कोटीपार पोहचणार

06:01 AM Dec 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एसबीआयच्या अहवालात माहिती: आर्थिक वर्ष 2024 मध्ये 15 कोटी डिमॅट खाती

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

आर्थिक वर्ष 2024 मध्ये पाहता डिमॅट खात्यांची संख्या 15 कोटीच्या स्तरावर पोहचली असून यापैकी 9.2 कोटी गुंतवणूकदार एनएसईवर आहेत. 2024 चे कॅलेंडर वर्ष सरत आले असून यावर्षी नव्या डिमॅट खात्यांची संख्या 4 कोटींवर पोहचू शकते. ही माहिती स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी आपल्या संशोधन अहवालात दिली आहे.

गेल्या काही वर्षातील खात्यांवर नजर टाकल्यास युवा पिढीचा कल गुंतवणूकीकडे अधिक दिसून आला आहे. त्यातही प्रत्येक चार गुंतवणूकदारांत एक महिला डिमॅट खाते उघडताना दिसली आहे, असेही एसबीआयने म्हटले आहे. यातही गुंतवणूकदारांचे वय 30 च्या आसपास आहे. सध्याला पाहता एकूण डिमॅट खात्यांची संख्या 17.76 कोटी इतकी आहे.

लवकरच 4 कोटीचा टप्पा ओलांडणार

या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत डिमॅट खाते उघडणाऱ्यांची संख्या 3.9 कोटी इतकी आहे. बेंगळूर, हैदराबाद, कानपूर यासारख्या शहरातून म्युचअल फंडात थेटपणे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढली आहे.  इक्विटीत थेटपणे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्dया सर्व स्तरावर कमालीची वाढली आहे. 2021 नंतरच्या एकंदर पुढच्या कारकिर्दीतील गुंतवणुकीचा कल पाहिल्यास दरवर्षी सरासरी 3 कोटी नवी डिमॅट खाती उघडली जात असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एकूण सध्याची डिमॅट खाती- 17.76 कोटी

कॅलेंडर 2024 वर्षातली सध्याची खाती- 3.9

वार्षिक सरासरी उघडली जाणारी खाती-3 कोटी

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social work
Next Article