कोरोना रुग्णांची संख्या हजाराहून अधिक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या भारतात नोंद झालेले रुग्ण 1 हजार 9 इतके आहेत. त्यांच्यापैकी बहुतेकांना अत्यंत सौम्य लक्षणे दिसत आहेत. तर काहीजणांवर तातडीचे उपचार केले जात आहेत. गेल्या एका आठवड्यात रुग्णसंख्येत साधारणत: 800 ची वाढ दिसून आली आहे. ही स्थिती चिंताजनक नसली, सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जगभरात कोरोनाची काही नवी रुपे उत्क्रांत झाली असून भारतात एनबी 1.8.1 आणि एलएफ 7 ही रुपे अधिक प्रमाणात दिसून आली आहेत. त्यांच्यापैकी एनबी 1.8.1 हे रुप तामिळनाडून 21 मे या दिवशी आढळले होते. ही दोन्ही रुपे फराशी धोकादायक असून सौम्य आहेत. गेल्या आठवड्याता केरळ, महाराष्ट, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 1,009 सक्रीय रुग्णांपैकी 430 एकट्या केरळमधील आहेत. या राज्यात एका आठवड्यात रुग्णसंख्या 335 ने वाढली आहे. त्यामुळे या राज्यात नागरीकांना नियम पाळण्याचे आणि दक्षता बाळगण्याचे आवाहन राज्य प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्रात एकंदर 209 सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या आठवड्यात 305 रुग्णांना ते बरे झाल्यामुळे घरी पाठविण्यात आले आहे.
जगभरात झपाट्याने वाढ
जगातील इतर देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सिंगापूरमध्ये 20 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. एका आठवड्यात 6 हजारांची वाढ झाली आहे. चीनमध्येही रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे काही स्थानांवर तातडीच्या उपायोजना करण्यात येत आहेत.