कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रीतिसंगम बागेतील घोणसच्या पिल्लांची संख्या १४ वर

05:36 PM Jun 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कराड 

Advertisement

येथील प्रीतिसंगम बागेत घोणसची पिल्ले सापडण्याची मालिका सुरूष असून सोमवारी एक पिल्लू सापडल्याने आत्तापर्यंत सापडलेल्या पिल्लांची संख्या १४ झाली आहेत. यातील एक पिल्लू मृत अवस्थेत सापडले तर १३ जिवंत पिलांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. दरम्यान सोमवारी दुपारी कोयनेश्वर मंदिरानजीक घोणसचे पिल्लू आढळून आले. सर्पमित्रांनी या परिसरात शोधमोहीम राबवली, मात्र ते पिल्लू सापडले नाही. प्रीतिसंगम बागेत अत्यंत विषारी घोणस जातीच्या सर्पाचे पिल्लू सापडल्याने खळबळ उडाली होती. यानंतर वाईल्ड हार्ट रेस्क्यूअर नाईटस् सोसायटी संस्थेच्या मयूर लोहाना, गणेश काळे, अजय महाडिक, रोहित कुलकर्णी, रोहित पवार, विशाल साठे, श्रीकांत नाटेकरी, सचिन मोहिते, विपुल कुराडे, अजय पवार, निलेश पाटील आदी सर्प मित्रांनी सलग तीन दिवसांपासून बागेत शोध मोहीम राबवून आतापर्यंत १३ पिल्लांना पकडून नैसर्गीक अधिवासात सोडले आहे.

Advertisement

शनिवारी रात्री कृष्णा घाटावर एका महिलेला घोणसच्या पिल्लाचा वंश झाल्याने त्या महिलेस उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. सर्पदंश झालेल्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. वरम्यान महिलेला दंश केलेल्या पिल्लाला पकडण्यातही सर्पमित्रांना यश आले आहे. सोमवारी सकाळी बागेत पुन्हा शोधमोहीम राबवली असता येथील कचऱ्याच्या ढिगात एक पिल्लू आढळून आले. दरम्यान परिस्थीतीचे गांभीर्य ओळखून माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर व माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी बागेत सुरू असेल्या शोधमोहिमेची पहाणी केली व सर्पमित्रांना सहकार्य करण्याच्या सूचना पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.

नाही घोणसची पिल्ले सापडल्याने गेली चार दिवसांपासून बाग बंद आहे. मात्र बागेच्या गेटला कुलुप लावण्यापलीकडे पालिकेकडून कुठलीही ठोस उपाययोजना राबवली गेली नाही. स्वतः उपाययोजना करायचे लांबच मात्र सामाजिक भान जपत चार दिवसांपासून शोधमोहीम राबवणाऱ्या सर्पमित्रांना पालिकेचे कसलेही सहकार्य लाभत नाही. सोमवारी कचऱ्याच्या ढिगात एक पिल्लू सापडल्यानंतर तो ढिग उचलण्यासाठी सर्पमित्रांनी जेसीबी मशिनची मागणी केली. याबाबत सुहास जगताप यांनी स्वतः अधिकाऱ्याऱ्यांना फोन करून जेसीबी मशिन उपलब्ध करून देण्यास सांगितले. मात्र दोन ते तीन तास प्रतीक्षा करूनही सर्पमित्रांना पालिकेचा जेसीबी मिळाला नाही. अखेर सुहास जगताप यांनी स्वखर्थाने जेसीबी उपलब्ध करून दिला. दरम्यान तीन तासानंतर पालिकेचा एक जेसीची बागेत आला. मात्र काम सुरू करण्यापूर्वी चालक डबा घेऊन बागेत जेवायला बसला काम सुरू करण्यासाठी तासभर लागेल, असे त्या जेसीबी चालकाने सर्पमित्रांना सांगितले. यानंतर पालिकेचा आणखी एक जेसीबी बागेत आला. यावरून चार दिवस झाले बाग बंद असली तरी पालिकेला त्याचे गांभीर्य नसल्याची चर्चा सुरू होती.

बागेत ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात गवत वाढले आहे. मात्र पालिकेकडून हे गवत काढण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. गवत काढणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी हॅन्डरलोग अथवा बुट असे कुठलेही साहित्य दिलेले नाही. मशिनने गवत काढण्याचे कामही अत्यंत संवगतीने सुरू आहे. पालिकेच्या या भूमिकेमुळे बाग अजून किती दिवस बंद ठेवणार, असा सवाल उपस्थित होत आहे. विजय वाटेगावकर यांनी केली पाहणी माजी आरोग्य सभापती विजय बाटेगावकर यांनी सकाळी बागेत भेट देऊन सर्पमित्र व पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रंगारयेस आणि कोयनेश्वर येथे वटपौर्णिमिला मोठ्या प्रमाणात बटाच्या झाडाची पूजा करायला येतात. सचि भय असल्याने प्रीतिसंगम बागेसह रंगारवेस व कोयनेश्वर येथे सर्पापासून सावधानता बाळगण्याविषयीचे फलक लावावेत, अशी मागणी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्याकडे केली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article