For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘चिपळूण-संगमेश्वर’चा पुढील आमदार भाजपचाच!

11:24 AM Aug 16, 2025 IST | Radhika Patil
‘चिपळूण संगमेश्वर’चा पुढील आमदार भाजपचाच
Advertisement

चिपळूण :

Advertisement

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, उद्योजक प्रशांत यादव हे 19 रोजी मुंबईतील कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजप नेते, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांची गुरुवारी पिंपळी येथील वाशिष्ठी डेअरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यादव यांना सर्वतोपरी ताकद दिली जाणार आहे. 2029च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून भाजपचा आमदार ताकदीने निवडून येईल, असा विश्वासही राणे यांनी यावेळी व्यक्त केला

ते पुढे म्हणाले, उद्योजक प्रशांत यादव हे रत्नागिरी जिह्यातील मोठे नेतृत्व आहे. एक कार्यकर्ता म्हणून नाही तर नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलं आहे, अनेकांना रोजगार दिला आहे. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा आग्रह होता, आम्हांलाही असा नेता आमच्या पक्षात आल्यामुळे निश्चितच फायदा होणार असल्याने आम्ही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 19 ऑगस्ट रोजी मुंबईतील नरिमन पॉइं&ट येथील भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत यादव यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्या प्रवेश सोहळ्dयातून संघटना अधिक भक्कम होईल. त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळं मोठं असून ते तळागाळापर्यंत पोहोचले आहेत.

Advertisement

आगामी निवडणुकांसंदर्भात बोलताना आमचा पक्ष विस्तारत चालला आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याने स्वबळावर निवडणुकांचा आग्रह त्यांच्याकडूनच वाढत चालला आहे. माझ्यापर्यंत त्यांची मागणी आल्यानंतर आम्हीही आमच्या नेत्यांपर्यंत त्यांचा आग्रह पोहचवला आहे. आम्हांलाही यानिमित्ताने आमची ताकद दाखवता येणार आहे. आमदार शेखर निकम हे महायुतीत असल्याने त्यांच्या संदर्भातील प्रश्नावरही बोलताना महायुतीतील प्रत्येक पक्ष आपापल्या पध्दतीने आपला पक्ष वाढवत आहे. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही स्वबळावर लढलो, तरच आमची ताकद वाढेल, असेही ते म्हणाले.
यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, राजेश सावंत, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

  • प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार : राणे

यादव यांच्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनीही दिलेल्या ऑफरसंदर्भात पत्रकारांनी छेडले असता राणे म्हणाले की, पालकमंत्री सामंत हे आमचे ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांनी यादव यांच्यासाठी प्रयत्न केले असतील तर त्यामध्ये काही चुकीचे नाही. शेवटी प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, आम्ही यादव यांची योग्यता पाहून निर्णय घेतला आहे. गेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत
प्रशांत यादव फक्त 6 हजार 800 मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे ही मतांची आकडेवारी किरकोळ आहे. मीही निवडणुका जिंकलेलो आहे. त्यामुळे 2029च्या विधानसभा निवडणुकीत येथून भाजपचा आमदार पूर्ण ताकदीने निश्चितच विजयी होईल, असा विश्वास मंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.