महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोठी बातमी ! क्रीडा मंत्रालयाने नवनियुक्त भारतीय कुस्ती संघ केला बरखास्त

12:19 PM Dec 24, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

भारतीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी मोठा निर्णय घेत नवनियुक्त भारतीय कुस्ती संघाला बरखास्त केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीला रामराम ठोकला तर बजरंग पुनियाने देखील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पद्म पुरस्कार परत केला होता. खेळाडूंमधील होणाऱ्या विरोधानंतर सरकारने कुस्ती महासंघ बरखास्त करत संजय सिंह यांनी घेतलेले सर्व निर्णयही स्थगित केले आहेत.

Advertisement

सध्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तर संजय सिंह यांना निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, कुस्ती महासंघाच्या घटनेनुसार स्पर्धेचं आयोजन झाले नाही असे क्रीडा मंत्रालयाने जाहीर केले आहे. याबाबत पुढील आदेश येईपर्यंत कुस्ती महासंघावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
disbandedindianwrestlingsportministrytarunbhartteamwrestling
Next Article