...नव्या आवृत्तीची मारुती डिझायर 11 नोव्हेंबर रोजी होणार सादर
अपडेटसह सेडानला सनरुफ व 6 एअरबॅग्जची सुविधा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मारुती सुझुकी 11 नोव्हेंबर रोजी आपली सर्वाधिक विक्री होणारी सेडान डिझायरची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करणार आहे. चौथी पिढी मारुती सुझुकी डिझायर कंपनीच्या हॅचबॅक मारुती स्विफ्ट प्लॅटफॉर्मवर आधारित राहणार असल्याची माहिती आहे. तसेच त्याची रचना पूर्णपणे वेगळी राहणार आहे. कारमध्ये सनरूफ, 6 एअरबॅग्ज मानक आणि अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्स देण्यात येणार आहेत.
सेडान 5 प्रकारांमध्ये लॉन्च केली जाणार आहे. यामध्ये एलएक्सआय, व्हीएक्सआय, व्हीएक्सआय(ओ), झेडएक्सआय आणि झेडएक्सआय प्लस अशी अद्ययावत मॉडेल्स राहणार आहेत. तसेच यांची एक्स-शोरूम किंमत 6.99 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. डिझायरची सध्या किंमत 6.57 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. सेडान सेगमेंटमध्ये त्याची स्पर्धा हेंडा अमेझ, ह्युंडाई अॅरो आणि टाटा टीयागो यांच्यासोबत राहणार आहे.
ही वैशिष्ट्यो....
स्विफ्ट फेसलिफ्ट, फ्रँक्स, बलेनो आणि ब्रिझा यांच्यापासून प्रेरणा घेऊन नवीन पिढीच्या डिझायरला ब्लॅक आणि व्हाइट ड्युअल-टोन थीमसह सर्व-नवीन डॅशबोर्ड लेआउट मिळेल. यात 9.0-इंच फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टम, स्लीक एसी व्हेंट्स आणि लोअर एचव्हीएसी कंट्रोल्ससह नवीन डॅशबोर्ड लेआउट मिळेल. याशिवाय अत्याधुनिक फिचर्सही सोबत दिली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.