'भूल चूक माफ'च्या प्रदर्शनाची नवी तारीख आली समोर
मुंबई
अभिनेता राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा भूल चूक माफ हा सिनेमा ९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन करण शर्मा यांनी केलेले आहे. करण शर्मा यांनी महाराणी या सिरीजचे दिग्दर्शन केले होते. भूल चूक माफ हा सिनेमा १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाची नवीन प्रदर्शनाची तारीख समोर येत आहे. सिनेमाची निर्माती मॅडडॉकचे दिनेश विजन यांनी केली आहे. मॅडडॉकच्या ऑफीशियल एक्स च्या हॅण्डेलवरून सिनेमाच्या नव्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे.
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या या रोमॅण्टीक कॉमेडी असलेल्या या सिनेमात मुख्य पात्रांच्या लग्नाची गोष्ट आहे. राजकुमार राव साकारत असलेले रंजन हे पात्र सकाळी उठल्यावर त्याच्या हळदी च्या कार्यक्रमात आहे. लग्नाच्या तारखेला उठूनही हळदीच्याच कार्यक्रमाची तयारी सुरु असल्याने रंजन गोंधळून जातो, अशा प्रकारचे कथानक सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. आता ९ मे रोजी कळेल, भूल चूक माफ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का नाही ?