For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवे एमएसएमइ क्रेडिट असेसमेंट मॉडेल मार्च 2025 पर्यंत सादर होणार

06:58 AM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
नवे एमएसएमइ क्रेडिट असेसमेंट मॉडेल मार्च 2025 पर्यंत सादर होणार
Advertisement

सध्या निम्मी तयारी पूर्ण : 2024-25 च्या वर्षाअखेर लाँचिंग शक्य

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी (पीएसबी)नवीन सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग(एमएसएमइ) क्रेडिट असेसमेंट मॉडेल मार्च 2025 पर्यंत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. या मॉडेलची सुमारे निम्मी तयारी पूर्ण झाली आहे आणि ते करण्याचे नियोजन आहे. 2024-25 आर्थिक वर्षाच्या अखेरीस सादर केले  जाणार असल्याचे पीएसबीच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तपत्राला सांगितले आहे.

Advertisement

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी पीएसबीएससाठी आर्थिक वर्ष 2025 च्या अर्थसंकल्पात एमएसएमइएससाठी बाह्य मूल्यांकनाची गरज कमी करण्यासाठी अंतर्गत क्रेडिट मूल्यांकनाची क्षमता विकसित करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यांनी असेही सूचित केले की, पीएसबीएस एमएसएमइच्या डिजिटल फूटप्रिंट्सवर आधारित नवीन क्रेडिट मूल्यांकन मॉडेल विकसित करतील किंवा प्राप्त करतील.

क्रेडिट मूल्यमापनासाठी पारंपारिक क्रेडिट स्कोअरऐवजी, नवे मॉडेल

एमएसएमइच्या सप्लाय-चेन डायनॅमिक्स, डिजिटल फूटप्रिंट्स आणि उद्योग-विशिष्ट परिस्थितींवर लक्ष केंद्रित करेल. हे अधिक व्यापक आणि अचूक मूल्यांकन प्रदान करेल. सध्या, बँकांना एमएसएमइला 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी बाह्य क्रेडिट रेटिंग आवश्यक आहे जे कधीकधी 30 कोटी रुपयांपेक्षा कमी कर्जांना देखील लागू होते, ज्यामुळे एमएसएमइवर आर्थिक दबाव वाढतो. नवीन प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग (एमएल) आणि बिग डेटा अॅनालिटिक्स सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करेल. जीएसटी फाइलिंग, व्यवहाराचा इतिहास आणि युटिलिटी पेमेंट यांसारख्या डिजिटल स्त्राsतांकडून डेटा गोळा करून प्रत्येक एमएसएमइसाठी सर्वसमावेशक आर्थिक प्रोफाइल तयार करेल. क्रेडिट मूल्यमापन अचूक ठेवून हे प्रोफाइल कालांतराने गतिमानपणे अपडेट होईल.

Advertisement
Tags :

.