For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रामलल्लाच्या नव्या मूर्तीचे घडले दर्शन

06:24 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
रामलल्लाच्या नव्या मूर्तीचे घडले दर्शन
Advertisement

राजस्थानचे मूर्तिकार सत्यनारायण पांडे यांच्याकडून साकार

Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापन करण्यासाठी तीन मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. शास्त्र आणि रामायणात भगवान राम यांना शामल वर्णाचे संबोधिण्यात आले आहे. याच कारणामुळे राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची शामल रंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तर मार्बलद्वारे तयार शुभ्र रंगाची रामलल्लाची मूर्ती देखील आता भाविकांसमोर सादर करण्यात आली आहे.

Advertisement

राजस्थानचे मूर्तिकार सत्यनारायण पांडे यांनी ही शुभ्र रंगाची रामलल्लाची मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती मंदिराच्या पहिल्या मजल्यावर दर्शनासाठी स्थापन केली जाऊ शकते. श्वेत रंगाची रामलल्लाची मूर्ती अत्यंत आकर्षक दिसून येत आहे. मूर्तीच्या चरणांमध्ये भक्त हनुमान विराजमान आहेत. मूर्तीच्या चहुबाजूला श्रीहरिचे 10 अवतार दर्शविण्यात आले आहेत. यात भगवान विष्णूचे मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्कि अवतार दर्शविण्यात आला आहे.

तर तिसरी मूर्ती कर्नाटकातील गणेश भट्ट यांनी तयार केली आहे. या मूर्तीचे छायाचित्र अद्याप समोर आलेले नाही. ही मूर्ती देखील राम मंदिरात विराजमान होऊ शकते. तर मुख्य गर्भगृहात विराजमान मूर्ती अरुण योगीराज यांनी साकारली आहे. बालस्वरुपातील ही मूर्ती अत्यंत विलोभनीय दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.