For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगाल वॉरियर्सचा नवा प्रशिक्षक वर्ग

06:22 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंगाल वॉरियर्सचा नवा प्रशिक्षक वर्ग
Advertisement

वृत्तसंस्था/कोलकत्ता

Advertisement

आगामी प्रो कबड्डी लिग हंगामासाठी बंगल वॉरियर्स संघाने नव्या प्रशिक्षक वर्गाची घोषणा केली आहे. बंगाल वॉरियर्सच्या प्रमुख प्रशिक्षकपदी प्रशांत सुर्वे तर सहाय्यक प्रशिक्षकपदी प्रवीण यादवची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या वर्षीच्या प्रो कबड्डी लिग हंगामात बंगाल वॉरियर्सच्या प्रमुख प्रशिक्षकपदी के. भास्करन् यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण के. भास्करन्ची दहाव्या प्रो कबड्डीr लिग हंगामासाठी प्रमुख प्रशिक्षकपदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याने ही जबाबदारी आता प्रशांत सुर्वेकडे सोपविण्यात आली आहे. कोलकत्त्याच्या बंगाल वॉरियर्स कबड्डी संघाने 2019 साली प्रो कबड्डी लिग स्पर्धा जिंकली होती. दहाव्या प्रो कबड्डी लिग हंगामात बंगाल वॉरियर्सला बाद फेरी गाठता आली नाही. त्यांना सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता 2024 च्या 11 व्या प्रो कबड्डी लिग हंगामामध्ये दर्जेदार कामगिरी होण्याकरिता बंगाल वॉरियर्सच्या फ्रान्चायजीने प्रशिक्षक वर्गामध्ये मोठा फेरबदल केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.