पाकिस्तानातील आश्रयाला 2पूर्णविरामाची आवश्यकता पाकिस्तानातील आश्रयाला 2पूर्णविरामाची आवश्यकता
पाकिस्तानात सध्या दहशत पसरविली आहे ती अज्ञात गनमॅननी. ज्या दहशतवाद्यांनी देशात दहशत माजविली अथवा दहशतवादी कारवाया केल्या त्यांचा खात्मा अज्ञात गनमॅननी केला. हे गनमॅन कोण? अद्याप ना आयएसआयला कळले ना पाकिस्तानी लष्कराला. हे सर्वजण अजूनही दहशतीत आहेत. एवढे असूनही सध्या आवश्यकता आहे ती पाकिस्तानातील आश्रयीतांना कायमस्वऊपी पूर्णविराम देण्याची.
पवित्र देशाच्या पावनभूमीत जन्म घेतला..मातृभूमीने त्यांना अंगा-खांद्यावर खेळविले.. आता त्याच मातृभुमीच्या गळ्याचा घोट घेण्यासाठी बोकडाच्या अवलादी राजरोसपणे पाकिस्तानात बसून षडयंत्र रचत आहेत. ज्या देशाने ओळख दिली. ज्या देशाच्या शहरात, गाव-खेड्यात स्वतंत्रपणे यांना मुक्तसंचार करण्याचे अधिकार दिले. त्याच नराधमांनी आता मातृभूमीवर हल्ला करण्यास सुऊवात केली आहे. अशा गद्दार आणि बोकडाच्या अवलादींना पाकिस्तानने केवळ आश्रयच नाही तर राजाश्रय दिला असून, या आश्रयाला कायमस्वऊपी पूर्णविराम देण्याची आवश्यकता आहे.
2014 पासून देश बदलला आहे. शांततेची भूमिका घेणाऱ्या देशावर कोणी वाकड्या नजरेने जरी पाहिले तरी घरात घुसून मारण्याची धमक देशाच्या नसानसात भिनली आहे. हीच वेळ आहे पाकिस्तानातील या गद्दारांना घरात घुसून मारण्याची. खूप सहन केले पण आता नाही. देशाची आार्थिक राजधानी असलेल्या मुंबईला यापूर्वी वारंवार टार्गेट केले. कारण अर्थवाहिनीला निशाना बनविला तर देश कोलमडेल. अशा गद्दारांच्या अटकळी होत्या. मात्र जेव्हा जेव्हा देशावर हल्ले केले तेव्हा तेव्हा देश आणि देशवासीय तेवढ्याच निडरतेने, धैर्याने उभे राहिले. हेच या दहशतवाद्यांच्या डोळ्यात खुपते. देशाची कमजोरी शोधून त्यावर हल्ला करण्यासाठी देशातील गद्दारांना पैसा, हनिट्रॅपमध्ये अडकवून माहिती काढण्याचे प्रकार यापूर्वी घडले. मात्र ते वेळोवेळी हाणून पाडले. अगदी काल-परवा दिल्लीतून गद्दार आयएसआयचे हस्तक एकाच वेळी उचलले. तर या हस्तकांच्या लिंक मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये सक्रीय असलेल्या भुरट्या चोरांशी असल्याचे आढळून आले. हे भुरटे चोर कोण? सध्या पाकिस्तानच्या टाकलेल्या तुकड्यावर जगत असलेला मोहम्मद अली रोडवरील दाऊद, दाऊदच्या च•ाrचा नाडा बांधणारा शकील आणि जोगेश्वरीच्या कचराकुंडीजवळ राहुन बिड्या चोरणारा झिंगाडा. यांना पाकिस्तानने आश्रय दिला, का तर हे तिघे मुंबईतील अंडरवर्ल्डमधील चोरांचे साथीदार असून, यांच्या मदतीने देशात दहशतवादी कारावाया घडविता येतील.
याला काही प्रमाणात 1993 साली यश देखील आले. मुंबईत एकाचवेळी 12 ठिकाणी साखळी
बॉम्बस्फोट घडविण्यासाठी आयएसआयने भुरट्या दाऊदचा वापर कऊन घेतला. तर या भुरट्याने ज्या मुंबईत दिवस काढले, त्याच्या आई-बाप भावांना मुंबईने सांभाळले. त्याच मुंबईचा घास गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबई पोलिसांनी तो हाणून पाडला. सध्या हा भुरटा पाकिस्तानात बेडवर पडून आहे. त्याच्या च•ाrचा नाडा बांधणाऱ्या शकीलमार्फत तो देशात दहशत माजविण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी देशाची सुत्रे हाती घेतल्यापासून या भुरट्याची डाळ शिजत नाही. यामुळे त्याने जोगेश्वरीच्या बिडी चोर झिंगाडाला बँकॉक पोलिसांच्या हातून पाकिस्तानात आणण्यासाठी आयएसआयच्या मागे तगादा लावला. बरे झिंगाडाच का? तर सप्टेंबर 2000 मध्ये बँकॉकमध्ये छोटा राजन या गँगस्टरवर झिंगाडाने जीवघेणा हल्ला केला होता. झिंगाडा हा भुरटा खुनशी आणि मरणाला न घाबरणारा आहे अशी समजूत या शकीलची होती. त्यामुळे खोटी-नाटी कागदपत्रे जमवून झिंगाडाला पाकिस्तानात आणले. मात्र शकीलने ज्या झिंगाडाला तुरमखान समजले तो झिंगाडा तर भिगी बिल्ली निघाला. कारण पाकिस्तानात येताच, या भुरट्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ला झाला. ज्या झिंगाडाच्या जोरावर देशात दहशत माजवायला निघालेल्या आयएसआयला झिंगाडालाच संरक्षण देण्याची वेळ आली.
यापूर्वी भुरट्या दाऊदला धमकी आली तसेच त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला यामुळे त्याला संरक्षण देत, भक्कम संरक्षित किल्यात ठेवले. तर त्याचा नाडा बांधणाऱ्या शकीलवर राजन गँगच्या फरिद तनाशा, विक्की मल्होत्राने हल्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला संरक्षण दिले. शकीलच्या सांगण्यावऊन झिंगाडाला पाकिस्तानात आणले तर तो सर्व पलटण घेऊन देशात दहशत माजवेल. पण कशाचे काय? येथे बिडी चोर झिंगाडालाच संरक्षण देण्याची वेळ आयएसआयवर आली. पण करणार काय? असा प्रश्न सध्या आयएसआयच्या पुढे आहे. कारण सध्या पाकिस्तानात आर्थिक टंचाई आणि महागाईने कळस गाठला आहे. कोणत्याही वेळेस पाकिस्तानची जनता रस्त्यावर उतऊन आयएसआय तेथील लष्कर आणि राज्यकर्त्यांना पळवून-पळवून मारेन हे सांगता येत नाही. यामुळे अवैध धंद्यातून भुरट्या दाऊदने कमाविलेल्या पैशासाठी पाकिस्तानला या आश्रयीतांना सांभाळण्याची वेळ आली आहे. कारण या आश्रयीतांना सांभाळले तर हे आज ना उद्या देशात जिहादी दजशतवाद माजवतील आणि पुन्हा एकदा पाकिस्तानी जनतेची सहानुभुती आणि प्रेम मिळविता येईल. कारण भारतावर हल्ला म्हणजे पाकिस्तानात स्वत:चे महत्त्व वाढविणे हे आयएसआयला देखील माहित आहे, येथील दहशतवादी संघटनांना देखील माहीत आहे. तसेच दाऊद, शकील आणि झिंगाडा या भुरट्यांना देखील याची कल्पना आहे.
मात्र बस्स झाले. यापूर्वी देशात दहशतवादी कारवाया करणाऱ्या तसेच वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना अज्ञात दुचाकीस्वारानी भर दिवसा गोळ्या घालून ठार मारले. तीच परिस्थिती या तिघांवर यावी. कारण भारतमातेचे खुप मोठे नुकसान करण्यामागे या भुरट्यांचा हात आहे. दाऊद हा भुरटा मरणापंथाला लागला आहे तरी तो देशात जिहादी गरळ ओकत आहे. अनेक देशवासीयांचा तळतळाट या भुरट्यांनी घेतला आहे. हे केवळ कशासाठी तर अवघे धर्मासाठी. धर्माच्या नावाने पैसे उकळण्यासाठी.
याचा परिपाक असा झाला की यांची मुले नामर्द निघाली. जे आपण केले ते मुलांना जमणार नाही हे भुरट्यांना माहीत असल्याने त्यांनी मुलांना धर्माच्या सेवेसाठी ठेवले. मात्र बस्स झाले. आता आवश्यकता आहे ती पाकिस्तानातील आश्रयीतांना पूर्णत: पूर्णविराम मिळेल याची. ज्यादिवशी पाकिस्तानात या आश्रयीतांना पूर्णविराम मिळेल त्यादिवशी देशातील सर्व देशवासीयांना मन:शांती मिळेल.
अमोल राऊत