Political News | लव्ह जिहादविरोधी कडक कायद्याची गरज
05:35 PM Jun 12, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
महाराष्ट्रातही लव्ह जिहादविरोधी कायदा कडक करण्याची गरज
रत्नागिरी : गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहादविरोधी कायदा अधिक कडक करण्याची गरज हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी व्यक्त केली. कोल्हापूर आणि अमरावती येथील धक्कादायक घटनांचे दाखले देत, हा कोणताही वैयक्तिक विषय नसून हिंदुत्व संपवण्याचा एक सुनियोजित डाव असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
चिपळूण, लांजा तालुक्यांपासून ते थेट पुणे, मुंबई आणि नाशिकसारख्या महानगरांतील आयटी कंपन्या आणि राष्ट्रीयीकृत बँकांपर्यंत 'लव्ह जिहाद'चे जाळे पसरले आहे. हे संकट आता 'हायटेक' झाले आहे. या गंभीर विषयावर हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी घेतलेल्या रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केले आहेत.
रविवार, १४ जून रोजी दुपारी ४ ते सायं. ६.३० या वेळेत ‘जयेश मंगल पार्क’, थिबा पॅलेस रोड, माळनाका, रत्नागिरी येथे होणाऱ्या या विशेष संवाद कार्यक्रमात रमेश शिंदे, स्वाती खाडये आणि अधिवक्त्या प्रीती राऊत मार्गदर्शन करणार आहेत. या पत्रकार परिषदेला रमेश शिंदे यांच्यासह वर्षा ढेकणे, संदीप नाचणकर, दादा ढेकणे, गणेश गायकवाड, किशोर भुते उपस्थित होते.