For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात अरुंद शहर

06:47 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वात अरुंद शहर
Advertisement

नदी काठावर अनोख्या इमारतींची निर्मिती

Advertisement

जगातील सर्वात अरुंद शहराबद्दल बहुतांश लोकांना फारशी माहिती नसावी. हे शहर पर्वतांदरम्यान एका नदीच्या दोन्ही काठावर वसलेले आहे. याचमुळे याला सर्वात अरुंद शहर असा दर्जा मिळाला आहे. परंतु या शहरात 5 लाखांहून अधिक लोकांचे वास्तव्य आहे. या शहराचे नाव यांजिन असून ते पर्वतांदरम्यान वाहणाऱ्या नांक्सी नदीच्या दोन्ही काठावर वसलेले आहे. यांजिन हे चीनमधील प्रमुख शहर आहे.

Advertisement

या शहरात काही मोठमोठी अपार्टमेंट्स देखील आहेत. चीनच्या युनान प्रांतात वसलेल्या या शहराला जगातील सर्वात नॅरोइस्ट सिटी मानले गेले आहे. पर्वतांमध्ये वसलेल्या या शहराचे सौंदर्य पाहण्याजोगे आहे. हे शहर एखादा चित्रपट किंवा माहितीपटाचा हिस्सा वाटते.

शहराचा सर्वात अरुंद भाग 30 मीटरचा आहे. तर सर्वाधिक फैलावलेला भाग 300 मीटर रुंद आहे. नदीच्या दोन्ही काठांवर एक-एक रस्ता असून त्यावरून प्रवास करत लोक बाहेर पडतात. तर पर्यटक देखील याच रस्त्यांद्वारे या शहरात प्रवेश करतात. नदीमुळे रस्ते अनेक किलोमीटर लांब आहेत, नदीच्या काठावर घरे निर्माण करण्यात आली आहेत. परंतु पूलांची संख्या कमी आहे. पर्वतांदरम्यान वसलेल्या या शहरात पूरापासून वाचण्यासाठी नदीच्या काठावरील इमारतींना स्तंभांच्या आधारे निर्माण करण्यात आले आहे. जेणेकरून पूराचे पाणी इमारतीखाली राहील. येथे राहणाऱ्या बहुतांश लोकांच्या अनेक पिढ्या येथे राहिल्या आहेत. अशा स्थितीत हे लोक शहर सोडून जाऊ इच्छित नाहीत.

Advertisement
Tags :

.