महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जगभर राम नामाचा जयजयकार

06:22 AM Jan 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्सव

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना भारताबरोबरच जगभरातही राम नामाचा जयजयकार करण्यात आला. नेपाळमधील जनकपूर येथील जानकी मंदिराची सजावट करण्यात आली आहे. येथे सायंकाळी एक लाखाहून अधिक दिवे लावण्यात आले. त्याचबरोबर न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवरही कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू असतानाच जोरदार सेलिब्र्रेशन करण्यात आले. तसेच श्रीलंकेतील सीता एलिया मंदिरात पूजा आणि भजन करण्यात आले. याचठिकाणी रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर ठेवल्याची कथा सांगितली जाते. इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन यांनी हिंदीत ट्विट करून राम मंदिरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील श्री दुर्गा मंदिरात अयोध्या राम मंदिराचा अभिषेक सोहळा साजरा करताना भाविक दिसले. यावेळी मंदिरात राम भजन करण्यात आले. याशिवाय भारतीय वंशाचे लोक हातात झेंडे घेऊन ‘जय श्रीराम’ म्हणताना दिसले. वेस्टर्न सिडनीतील पररामट्टा पार्क आणि मेलबर्नमधील किंग्सले पार्कमध्येही अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषदेशिवाय 25-50 संघटनांनी ब्रिस्बेन, पर्थ, अॅडलेड आणि न्यू साउथ वेल्समध्येही कार्यक्रम आयोजित केले होते. केनिया, टांझानिया, युगांडा आणि मोझांबिक सारख्या अनेक आफ्रिकन देशांमध्ये कार रॅलीसह अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

न्यूझीलंडच्या मंत्र्यांचे ‘जय श्रीराम’

न्यूझीलंडचे मंत्री डेव्हिड सेमोर यांनी जय श्रीरामचा नारा दिला. त्यांनी गळ्यात भगवी शाल गुंडाळून राम मंदिरासाठी संपूर्ण भारताला शुभेच्छा दिल्या. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे मंदिर 500 वर्षांनंतर बांधले गेले आहे, जे हजारो वर्षे टिकेल. राम मंदिरात जाऊन मला आनंद होईल’, असेही त्यांनी स्पष्ट केले. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त रामभक्तांनी रॅली काढली. ही शोभायात्रा पॅरिसच्या महत्त्वाच्या भागातून फिरत संध्याकाळी आयफेल टॉवरवर पोहोचली होती. शोभायात्रा काढण्यापूर्वी विश्व कल्याण यज्ञही करण्यात आला.

मॉरिशसमध्ये जल्लोषी वातावरण

मॉरिशसची 48 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. तेथील सरकारने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हिंदूंना सोमवारी दोन तासांचा विशेष ब्र्रेक दिला होता.  प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्याचा यामागे मुख्य उद्देश होता. याचदरम्यान मॉरिशसच्या सर्व मंदिरांमध्ये दिवे प्रज्वलित करण्यात आले. सर्वत्र राम नामाचा जप झाला. या उत्सवाची सुऊवात मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांनी सपत्नीक मंदिरात दिपोत्सव केला. यावेळी त्यांनी “रामाच्या अयोध्येत परतण्याचा आनंद साजरा करूया. जय हिंद.” असे म्हटले.

अमेरिका-ब्रिटनमध्ये थेट प्रक्षेपण

ब्रिटन-अमेरिकेतही राम नामाचा जप ठिकठिकाणी करण्यात आला. मिनेसोटा राज्यातील भारतीय समुदायाच्या लोकांनी सोमवारी भजन केले. न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरसह अमेरिकेतील जवळपास 300 ठिकाणी थेट प्रक्षेपित करण्यात आला. यानंतर सर्व मंदिरांमध्ये प्रसाद आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ब्रिटनमध्ये हिंदू समाजाच्या लोकांनी अभिषेक करण्यापूर्वी कार रॅली काढली. ही रॅली पश्चिम लंडनमार्गे पूर्व लंडनमध्ये पोहोचली. याशिवाय 100 ठिकाणी रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. तैवानमध्येही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article