For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रह्मांडाच्या रहस्यांची होणार उकल

06:50 AM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
ब्रह्मांडाच्या रहस्यांची होणार उकल
Advertisement

आकाशगंगांच्या टक्करमुळे सर्वात शक्तिशाली मायक्रोवेव लेझरची निर्मिती : खगोलशास्त्रज्ञांचा दावा

Advertisement

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या एका टीमने ज्ञात ब्रह्मांडचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली मायक्रोवेव लेझर शोधल्याचा दावा केला आहे. हा असाधारण ऊर्जापुंज दोन आकाशगंगांच्या परस्परांमधील टक्करमुळे निर्माण झाला आहे. वैज्ञानिक भाषेत याला मेजर म्हटले जाते. म्हणजेच हे देखील लेझरप्रमाणे ऊर्जेचे एक अत्यंत अचूक आणि केंद्रीत किरण होते, परंतु यात डोळ्यांना दिसणाऱ्या प्रकाशाच्या जागी मायक्रोवेव तरंग निघतात हाच फरक आहे. संशोधकांनुसार हा आतापर्यंत पाहिला गेलेला सर्वात चमकदार आणि सर्वात दूरवरील मेजर आहे. हे अध्ययन नेचर अॅस्ट्रोनॉमी नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.

कसे तयार होते लेझर?

Advertisement

लेझर किंवा मेजर निर्माण होण्याची प्रक्रिया मूळ स्वरुपात एकसारखीच असते. यासाठी प्रथम अणूंना अस्थिर, उच्च ऊर्जा अवस्थेत पोहोचविले जाते, यानंतर जेव्हा प्रकाश कण म्हणजेच फोटॉन या उत्तेजित अणूंना धडकतात, तेव्हा ते स्वत:ची ऊर्जा सोडत नवे फोटॉन उत्सर्जित करतात. हे एक साखळी प्रतिक्रिया निर्माण करते, ज्यात सातत्याने अधिक संख्येत फोटॉन तयार होत जातात. प्रत्येक अणू एकसारखाचा फोटॉन निर्माण करत असल्याने पूर्ण किरण एकाच आवृत्ती म्हणजेच फ्रीक्वेंसीचे असते. याचमुळे एक अत्यंत केंद्रीत आणि सुसंगत बीम तयार होते, लेझरप्रमाणेच मायक्रोवेव तंरुंगाच्या स्वरुपात.

अध्ययनासाठी उपयुक्त

असे मेजर दूरस्थ आकाशगंगा आणि त्यांच्या केंद्रात होत असलेल्या घडामोडींचे अध्ययन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात असे तज्ञांचे मानणे आहे. याच्या मदतीने वैज्ञानिक आकाशगंगा कशाप्रकारे विकसित होतात, टक्करदरम्यान त्यांच्यात कोणत्या भौतिक प्रक्रिया घडतात आणि प्रारंभिक ब्रह्मांडात ऊर्जेचे वितरण कशाप्रकारे व्हायचे हे समजून घेऊ शकतात. या संशोधनाला ब्रह्मांडीय भौतिकीच्या क्षेत्रात एक मोठी कामगिरी मानण्यात येत आहे, कारण आकाशगंगांच्या हिंसक टक्करमुळे किती तीव्र आणि संघटित ऊर्जा र्माण होऊ शकते, जी अब्जावधी प्रकाश वर्षे अंतरावरून पृथ्वीवरही नोंद होऊ शकते हे  यातून दिसून येते.

का महत्त्वाचा आहे शोध?

हा शोध केवळ खगोलीय घटनेची नोंद नसून ब्रह्मांडाच्या प्रारंभिक इतिहासाला समजून घेण्यासाठी एक नवी खिडकी देखील आहे. इतक्या दूरवरील आणि शक्तिशाली मेजरद्वारे वैज्ञानिक हे जाणून शकतात की, आकाशगंगांच्या टक्करदरम्यान गॅस आणि धूळ कसे सघन असतात, सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलच्या आसपास ऊर्जा कशी केंद्रीत असते आणि तारा निर्मितीची प्रक्रिया किती तीव्र असते.

Advertisement
Tags :

.