महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिहारच्या कन्हैया मंडलचा खूनच

06:02 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मायणा-कुडतरी पोलिसांकडून खून म्हणून नोंदणी

Advertisement

प्रतिनिधी/ मडगाव

Advertisement

लोटली येथील कथित ‘हिट अँड रन’ प्रकरण आता खून म्हणून नोंद करण्यात आले आहे. गेले काही दिवस हे कथित हिट अँड रन प्रकरण गोव्यात गाजत आहे. या प्रकरणात फोंडा पोलीस स्थानकाच्या रॉबर्ट पथकातील तिघांना निलंबित करण्यात आले आहेत. पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी शुक्रवारी दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयाला भेट देऊन पोलीस अधीक्षक सुनीता सावंत, उपअधीक्षक संतोष देसाई व पोलीस निरीक्षकांशी चर्चा केली.

कन्हैया मंडलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे अगोदर पोलिसांनी सांगितले होते. मात्र, शवचिकित्सेनंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. कन्हैया याच्या गळ्यावर तसेच हातावर व पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याला मृत्यू आल्याचे शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले. कन्हैया याला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला रात्रीच्यावेळी लोटलीत आणून सोडले व दुसऱ्या दिवशी तो बेपत्ता झाल्याची नोंदणी केली. त्यामुळे फोंडा पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जाऊ लागला होता.

फोंडा पोलिसांच्या रॉबर्ट पथकातील हवालदारांनी अगोदर कन्हैया मंडल याला बोरी सर्कलजवळ सोडल्याचे सांगितले. मात्र, फोंडा पोलीस स्थानकाची रॉबर्ट व्हॅन लोटलीत वेर्णा औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याने गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेरातून स्पष्ट झाले व रॉबर्ट पथकातील हवालदार दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवताना गुरुवारी हेडकॉन्स्टेबल रवींद्र पी. नाईक, कॉन्स्टेबल अश्विन व्ही. सावंत व चालक प्रीतेश एम. प्रभू या तिघांना निलंबित करण्यात आले होते.

शुक्रवारी पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयाला भेट देऊन कन्हैया मंडल मृत्यू प्रकरणावर सखोल चर्चा केली व शवचिकित्सा अहवालाप्रमाणे तपास करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर शनिवारी हे प्रकरण खून म्हणून नोंद झाले.

आता खुन्याचा शोध सुरू

कन्हैया मंडल याला फोंडा पोलिसांच्या रॉबर्ट व्हॅनने लोटलीत आणून सोडल्यानंतर त्याचा खून कोणी केला, याचा तपास सध्या मायणा-कुडतरी पोलिसांनी सुरू केला आहे. कन्हैयाचा खून का व कशासाठी केला तसेच तो खून लोटलीत केला की अन्य ठिकाणी याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान मायणा-कुडतरी पोलिसांसमोर आहे. या संदर्भात फोंडा पोलिसांच्या रॉबर्ट पथकातील हवालदारच अधिक माहिती पुरवू शकतात अशी शक्यताही पोलीस वर्तुळात सुरू आहे.

पोलिसांनी या प्रकरणात अगोदर वाहनाचा पत्रा लागून कन्हैया याचा गळा चिरला असावा, अशी शक्यता व्यक्त केली होती. तसेच फोंडा रॉबर्ट पथकातील एका कॉन्स्टेबलने तशीच जबानी दिली होती. त्यात शवचिकित्सा अहवालात धारदार शस्त्राने गळा कापल्याने मृत्यू आल्याचे म्हटले होते. त्यामुळे रॉबर्ट पथकातील कॉन्स्टेबलना या प्रकरणातील सत्य परिस्थिती ठाऊक असावी, अशी शक्यताही वर्तविली जात आहे.

नातेवाईकांना तातडीने माघारी का पाठविले ?

कन्हैया मंडल याला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले होते, याची माहिती अगोदर त्यांच्या नातेवाईकांकडूनच प्राप्त झाली होती. कन्हैयाच्या मृत्यूनंतर त्याचा भावोजी गोव्यात आला होता. त्यानंतर शवचिकित्सा करण्यात आली आणि त्याच दिवशी त्याच्या भावोजीला तातडीने माघारी का पाठविले याचे कारणही आता तपास करणाऱ्या मायणा-कुडतरी पोलिसांना शोधावे लागणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article