For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपाची ऑनलाईन सेवा बुधवारी पूर्णपणे ठप्प

01:19 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनपाची ऑनलाईन सेवा बुधवारी पूर्णपणे ठप्प
Advertisement

दिवसभर दुरुस्तीचे काम

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेचा कर भरण्यासाठी वेबसाईट सुरू करण्यात आली होती. मात्र काही तासातच ही ऑनलाईन सेवा बंद झाली. त्यामुळे जनतेला कर भरताना ताटकळत थांबावे लागले. कधी सेवा सुरू होणार? याच्या प्रतीक्षेत बुधवारचा दिवस पूर्णपणे वाया गेला. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता सेवा बंद आहे, दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. पण सायंकाळपर्यंत ही वेबसाईट सुरूच झाली नव्हती. चलनद्वारे घरपट्टी किंवा कर भरताना जनतेला मनपाच्या विभागीय कार्यालयासमोर तब्बल तीन ते चार तास ताटकळत थांबावे लागत असल्याने ऑनलाईनद्वारे घरपट्टी व कर भरण्यासाठी जनतेची धडपड सुरू होती. सोमवारी सायंकाळी मनपाची घरपट्टी भरण्याची वेबसाईट सुरू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र विविध समस्यांनी कर भरणे आतापर्यंत अशक्यच झाले आहे. त्यामुळे ऑनलाईन कर भरणाऱ्या केंद्रांमध्ये नागरिकांना ताटकळत थांबावे लागले. काहीवेळाने सुरू होईल, या आशेवर अनेक जण थांबले होते. मात्र सायंकाळी 5 पर्यंत तरी ही वेबसाईट सुरूच झाली नाही. एप्रिल अखेरपर्यंत घरपट्टी भरल्यास सवलत मिळणार म्हणून या महिन्यामध्येच घरपट्टी भरण्यासाठी साऱ्यांचीच धडपड सुरू आहे. एक तर चलनसाठी रांगेत थांबावे लागत आहे. व ऑनलाईन भरायचे असेल तर वेबसाईटची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे बेळगावच्या जनतेने करायचे तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामाध्येही व्यस्थ झाले आहेत. त्यातच ही समस्या निर्माण झाल्याने सरकारकडे कर जमा होणे अवघड झाले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.