घरपोच घरफाळा बिलांसाठी पालिकेने खर्च केले दोन कोटी
कोल्हापूर / दीपक जाधव :
शहरातील मिळकतधारकांना घरफाळा बिले वेळेत भरता येण्यासाठी ती घरपोहोच पाठविण्याची योजना महापालिपेने सुरु केली. आहे. त्यासाठी महापालिकेकडून नऊ वर्षात 1 कोटी 11 लाख 38 हजार 667 मिळकत धारकांना घरफाळा बिले घरपोहोच करण्यासाठी तब्बल 1 कोटी 95 लाख 46 हजार 654 रुपये खर्च केले आहेत. एका बिलासाठी पोस्ट खात्याला महापालिका प्रशासन 17 रुपये 50 पैसे दिले जातात.
चालु आर्थिक वर्षासाठी प्रशासनाने घरफाळा विभागाला 104 कोटीचे टार्गेट दिले आहे. मिळकत धारकांना लवकर घरफाळा भरता यावा यासाठी पालिकेकडून भारतीय डाक विभागाच्या वतीने घरपोहोच बिले देणार आहेत. परिणामी नागरिकांना बिले भरणे सोयीचे होणार आहे. त्यामध्ये बिल भरण्यासाठी असलेल्या सवलतीनुसार रक्कम भरता येणार आहे. जूनअखेर घरफाळा भरल्यास बिलात 6 टक्के सवलत आहे. सध्या महापालिकेच्या घरफाळा विभागाकडे चार विभागीय कार्यालयासह अधिक्षकांपासुन ते शिपाईपर्यंत एकूण 69 कर्मचारी आहेत. त्यातील 36 लिपीक आहेत. उर्वरित 30 कर्मचारी संपूर्ण शहरात वेळेत बिले वाटु शकत नाहीत. त्यामुळेच नागरिकांना घरफाळा बिलाची सवलत मिळत नाही. याउलट शहरात पोस्ट विभागाकडे 110 पोस्टमन असुन ते पूर्ण दिवसभर काम करत असल्याने मिळकतधारकांना वेळेत बिले मिळत असून त्यांना सवलतीचा फायदा ही मिळत आहे.
सध्या महापालिकेच्या घरफाळा विभागाकडे कर्मचारी कमी आहेत. त्यांच्याकडून मिळकतधारकांना वेळेत बिले मिळत नाहीत. त्यामुळेच त्यांना घरफाळा बिलाची सवलत मिळत नाही. यासाठी आपण पोस्ट ऑफिसच्यावतीने घरपोहोच बिले देणार आहे.
सुधाकर चल्लावाड, घरफाळा अधीक्षक.
- नागरिकांची सोय
- बिलावर क्युआर कोड
- क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तत्काळ बिल भरता येणार
- शहरातील 12 पोस्ट ऑफिसमधून स्पीड पोस्टची सेवा
- सध्याचे मिळकतधारक
गांधी मैदान विभागीय कार्यालय 60,877
छत्रपती शिवाजी मार्केट कार्यालय 27,853
राजारामपुरी विभागीय कार्यालय 32,811
छत्रपती ताराराणी वि. कार्यालय 42,894
प्रलंबित जनरेशन 650
एकूण 1,65,085
वर्षे मिळकतधारक पोस्टाला अदा रक्कम
2016-2017 1 लाख 27 हजार 565 22 लाख 32 हजार 389
2017-2018 1 लाख 35 हजार 267 23 लाख 67 हजार 182
2018-2019. 1 लाख 20 हजार 567 21 लाख 09 हजार 926
2019-2020. 1 लाख 09 हजार 867 19 लाख 22 हजार 149
2020-2021 88 हजार 803 15 लाख 54 हजार 57
2021-2022. 1 लाख 28हजार 477 22 लाख 48हजार 355
2022-2023 1 लाख 32 हजार 830 23 लाख 24 हजार 542
2023-2024 1 लाख 34 हजार 935 23 लाख 61 हजार 372
2024-2025 1 लाख 38 हजार 667 24 लाख 26 हजार682