कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑक्टोबरमध्ये होणार महापालिकेची निवडणूक

01:26 PM May 07, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

कोल्हापूर महापालिकेचे सभागृह 15 नोव्हेंबर 2020 ला विसर्जित झाल्यानंतर तब्बल पाच वर्षाच्या प्रशासकीय राजनंतर आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रिम कोर्टाने पुढील 120 दिवसात निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने पावसाळा झाल्यानंतर ऑक्टाबरमध्ये महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. कोरोना आणि प्रभाग रचना त्यानंतर न्यायिक प्रक्रियेमुळे तब्बल तीनवेळा आरक्षण सोडत काढूनही प्रक्रिया लांबणीवर गेली होती. अजूनही प्रभाग रचना एकल की दुहेरी हा संभ्रम कायम असला तरी इच्छुकांनी चाचपणी सुरू केल्याने पुढील चार महिन्यात निवडणूक फिव्हर वाढत जाणार आहे.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “ग्रामस्तरावरील लोकशाहीची पायमल्ली होऊ देणार नाही, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटले. निवडणुका चार महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, ओबीसी आरक्षण 2022 पूर्वीच्या बांठीया आयोगाच्या अहवालानुसार राहील, असे स्पष्ट केल्याने कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. प्रभाग रचना, आरक्षण आणि मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर महापालिकेची मुदत 15 नोव्हेंबर 2020 ला संपली होती. गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया 2020-21 मध्ये पूर्ण झाली होती, परंतु कोविड-19 आणि ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे तीन वेळा स्थगित झाली. आता निवडणुकीचे बिगुल वाजले असले तरी शहरातील प्रभाग 81 राहणार की वाढणार ? प्रभाग रचना जुनीच एकल पद्धतीने होणार की दोन किंवा तीन प्रभागांचे एकत्रिकरण होणार याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.

महायुती (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार)) यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. स्थानिक मुद्दे, जसे की पाणीपुरवठा, रस्ते, आणि कचरा व्यवस्थापन हे मुद्दे महत्त्वाचे राहतील. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने महाविकास आणि महायुती स्वतंत्रपणे निवडणुका लढवून निवडणुकीनंतर एकत्र येणार की एकसंघपणे निवडणुका लढवणार याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल.

सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली होती. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली गेली होती, त्यानंतर 23 डिसेंबर 2020 ते 4 जानेवारी 2021 या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. परंतु, ओबीसी आरक्षणासंबंधीच्या कायदेशीर पेचामुळे आणि कोविड-19 साथीमुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली गेली.

सभागृह मुदत संपली : 15 नोव्हेंबर 2020
प्रभाग संख्या : 81
प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया : 2020-21 मध्ये पूर्ण
ओबीसी आरक्षणाचा आधार : 2022 पूर्वीचा बांठीया आयोग अहवाल
निवडणुका पूर्ण होण्याची मुदत : 6 सप्टेंबर 2025 पर्यंत जाहीर होणार कार्यक्रम

काँग्रेस - 29
राष्ट्रवादी - 15
भाजप-14
ताराराणी आघाडी -19
शिवसेना- 4
एकूण - 81
अपक्ष- तीन (पैकी दोन काँग्रेसकडे तर एक भाजपच्या गोठात)

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article