For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई पोलिसांनी कऊन दाखविले !

06:53 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंबई पोलिसांनी कऊन दाखविले
Advertisement

मुंबई शहरात कोणतीही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तरी त्यातून मुंबई पोलिसांनी लिलया मार्ग काढला आहे. अशावेळी स्वत: पोलीस दलाचे नेतृत्व करणारे खमके पोलीस आयुक्त देखील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मग तो कोणता दहशतवादी हल्ला असो की मराठा आंदोलकांची सुरक्षा आणि आंदोलन पार पाडण्याची जबाबदारी असो. अगदी त्याचप्रमाणे सीजेपीने केलेल्या देशभरातील आंदोलनाची झळ मुंबईला देखील लागली. मात्र अहोरात्र रस्त्यावर उतऊन हे आंदोलन शांततेत पार पाडत अखेर कऊन दाखविले.

Advertisement

शात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. जगात विश्वगुऊची उपाधी मिळालेल्या मोदी सरकारने प्रथमपासूनच सीजेपीचे आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याशी सल्लामसलतीसाठी प्रयत्न करण्यास सुऊवात केली होती. मात्र जोपर्यंत हे आंदोलन संपूर्ण देशात पोहचत नाही तसेच 20 जुलै रोजीचा देशाच्या संसदेवरील मोर्चाला यश येत नाही, तोपर्यंत सरकारशी असहकार करण्याची आडमुठी भूमिका सीजेपीने घेतली होती. कारण सीजेपीचा संस्थापक असलेल्या अभिजित दिपकेला मार्गर्शन करणाऱ्यामध्ये सर्वच देशभक्त नव्हते. तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वत:ची राजकीय पोळी भाजणारे, देशाबरोबर देशद्रोह करणारे अधिक होते. यामुळे ते सीजेपीला सरकारशी सल्लामसलत करण्यास अडचणी निर्माण करीत होते. यामुळे दिवसें-दिवस पोलीस दलावरील ताण अधिक वाढत चालला होता. अशातच या आंदोलनाचे चटके देशातील अनेक भागात बसण्यास सुऊवात झाली होती. ज्या महाराष्ट्रातून अभिजित दिपके येतो त्या ठिकाणी तसेच मुंबईत देखील राजकीय प्रेरीत आंदोलन चिघळण्यास सुऊवात झाली. मात्र राज्य तसेच मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची भंबेरी उडू नये, यासाठी अहोरात्र सज्ज असलेल्या मुंबई पोलिसांनी अखेर कऊन दाखविले. अतिशय शांततेत हे आंदोलन संपुष्टात आणले. याचे सर्व श्रेय हे मुंबई पोलीस आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या पोलीस आयुक्तांचे तर आहेच. त्याहुनही राज्याचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांचे अधिक आहे.

मुंबई पोलीस दलाची ख्याती अख्या जगात दुमदुमत असते. दहशतवादी हल्ला असो की अतिशय क्लिष्ट गुन्हा असो, तो मुंबई पोलीस दलाने चुटकीसारखा सोडविल्याचा इतिहास आहे. आज मुंबई पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठतेमुळेच सामान्य मुंबईकर सुखाची झोप घेत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेले हे मुंबई शहर जगातील व्यावसायिक, मनोरंजन, शैक्षणिक धरोहर असलेले शहर म्हणून ओळखले जाते. आज मुंबई पोलिसांची धुरा अशा अधिकाऱ्याच्या हातात आहे, ज्यांना मुंबईची खड्नाखडा माहिती तर आहेच त्याहूनही शहरात असलेल्या सर्व गुन्हेगार आणि त्यांची कार्यपद्धती यांची देखील माहिती आहे. मुंबई पोलीस आणि मुंबईकरांची सुरक्षा सक्षम अधिकाऱ्याच्या हातात आहे. येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षम आणि सतर्क असते. अशातच छत्रपती संभाजीनगरचा, राहणारा असलेला अभिजीत दिपके हा अमेरिकेच्या बोस्टन युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत होता. यापूर्वी अभिजित दिपकेचा संबंध हा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीशी आला होता. आप पक्षाची सोशल मीडिया विंगचा दिपके हा सदस्य होता. त्यातच 3 मे 2026 रोजी नीट यूजी परीक्षेचे पेपर लीक झाले. पेपर लीकच्या आरोपामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. 2024 सालीही नीट परीक्षेचे पेपर लीक झाल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. याचदरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या तोंडी काही समाजकंटकांनी बेरोजगार तऊणांचा झुरळ असा उल्लेख केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर फिरविण्यास सुऊवात केली. खरे तर हा व्हिडीओ आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (एआय) पुरस्कृत होता.

Advertisement

नेमका हा धागा पकडून अभिजीत दिपके याने अमेरिकेतूनच कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली. यावेळी दिपके याच्या मागे नेमके कोण होते? सीजेपीची संकल्पना आणि ते ही अमेरिकेत राहून यामुळे दिपके भोवती संशयाचे जाळे निर्माण झाले आहे. ते कधी ना कधी समोर येईलच, जर दिपकेला देशातील तरूणांची एवढी काळजी होती तर त्याने देशात येऊन सनदशीरमार्गाने आंदोलन करावे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवाव्यात. त्यासाठी उपरोधीक पक्षाची स्थापना करीत देशातील तरूणांना आंदोलनाच्या नावाखाली भडकविण्याचा प्रयत्न का केला? सीजेपीची स्थापना झाल्यानंतर चोविस तास लाखो मिलीयन फोलोअर्स कधी कोणाचे होतात का? हा देखील प्रश्न आहे. दिपके ज्यावेळेस जंतर मंतरवर पोहचले त्यावेळी अनेकदा सरकारशी सल्लामसलत करण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आले. सोनम वांगचुक याना पाचारण करण्यात आले. मात्र ज्या काही वाटाघाटी अथवा बोलणी असतील ते सर्व 20 जुलै नंतर कऊ अशी आडमुठी भूमिका का घेतली? असे  एक नाही तर अनेक प्रश्नांच्या संशयाचे जाळे दिपके भोवती फिरत आहे. ते वेळ आणि काळानुसार पुढे येईल. मात्र यामुळे ज्यांना नेमके आंदोलन कशासाठी आहे ते माहित नाही असे बाजार बुणगे देखील या आंदोलनात पंतप्रधानांना अर्वाच्च भाषा वापरत होते. गेल्या बारा वर्षात ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान उंच कऊन जगायला शिकविले. जे कधीही कोणत्या राष्ट्राच्या दबावाखाली झुकले नाहीत अशा पंतप्रधानांच्या बाबतीत अर्वाच्च भाषा वापरण्यात आली. ही आपली संस्कृती आहे का? हा देखील दिपकेनाच प्रश्न आहे.

ते काही असो या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देश तसेच राज्यात आणि त्यातल्या त्यात मुंबईत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस दल सज्ज झाले होते. मुसळधार पावसात देखील मुंबई पोलिसांनी अतिशय शांतताप्रिय वातावरणात हे आंदोलन पार पाडले. अशावेळी मुंबई पोलिसांचे कौतुक सत्ताधारी तर करीत होते. मात्र विरोधकांनी देखील केले. याचे सर्व श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त देवेन भारती यांना जाते. यापूर्वी देखील मुंबई पोलिसांनी राज्यातील अनेक ठिकाणाहून लाखोंनी आलेले मराठा आदोलकांचा मोर्चा व्यवस्थितरित्या सांभाळला होता. एकीकडे गणपती बंदोबस्त तर दुसरीकडे आरक्षणाच्या मागण्या घेऊन आलेले मनोज जरांगे पाहता तत्काळ सुट्टीवर गेलेल्या पोलिसांना ऑन डयुटी हजर राहण्याचे आदेश पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिले होते. मुंबई पोलिसांपुढे मुंबईकराबरोबरच मनोज जरांगे यांच्या बरोबर आलेल्या आंदोलनकर्त्यांची सुरक्षा महत्त्वाची होती. त्यासाठी मुंबई पोलीस सज्ज होते. मुंबईत कोसळणारा पाऊस, वाहनांची झालेली गर्दी यातून देखील मुंबई पोलिसांनी अतिशय संयमाने आणि शांततेने बंदोबस्त सुऊ ठेवला. आपल्याला कितीही त्रास झाला तरी चालेल मात्र बाप्पाच्या भक्तगणांना आणि आंदोलनकर्त्याला याची झळ पोहचता कामा नये. अशी साठगाठ मुंबई पोलिसांनी स्वत:शी बांधली होती. याचे सर्व श्रेय देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्तांचे होते. भविष्यात देखील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेसही मुंबई पोलीस कऊन दाखविणार!

अमोल राऊत

Advertisement
Tags :

.