For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई मॅरेथॉन 18 जानेवारीला

06:22 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंबई मॅरेथॉन 18 जानेवारीला
Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

रविवार दि. 18 जानेवारी रोजी टाटा पुरस्कृत मुंबई मॅरेथॉन आयोजित केली असून यामध्ये पुरूष आणि महिलांच्या विभागात अव्वल स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे. या स्पर्धेमध्ये देशातील आघाण्डीचे 36 अव्वल धावपटू भाग घेत आहेत.

पुरूषांच्या विभागात 23 तर महिलांच्या विभागात 13 धावपटूंचा समावेश राहील. इंडियन इलाईट पुरूष आणि महिलांच्या विभागातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2 लाख रुपये तसेच अतिरिक्त 2 लाख रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. पुरूषांच्या विभागात नितेंद्रसिंग रावत तर महिलांच्या विभागात सुधा सिंग यांच्या कामगिरीवर अधिक लक्ष राहील. मॅरेथॉनमधील माजी विजेते अनिष थापा आणि निर्माबेन ठाकुर हे प्रमुख आकर्षण राहतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.