महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गणेशभक्तांच्या मार्गात लटकंती...रखडपट्टीचे ‘शुक्लकाष्ठ’ प्रवाशांच्या मागे

01:35 PM Sep 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
The Mumbai-Goa highway
Advertisement

सीएसएमटी-सावंतवाडी गणपती स्पेशल धावली 16 तास उशिराने; अन्य 18 रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही बिघडलेलेच; चाकरमान्यांचे अतोनात हाल

राजू चव्हाण खेड

मुंबई-गोवा महामार्गावर हजारो वाहनांच्या संख्येने दुसऱ्या दिवशीही महामार्ग ‘पॅक’ होवून रखडपट्टीचे ‘शुक्लकाष्ठ’ कायम राहिले. महामार्गापाठोपाठ कोकण मार्गावरही लटकंतीच्या प्रवासासह रखडपट्टीचे ‘विघ्न’ कायमच राहिल्याने शुक्रवारीही गणेशभक्तांचे अतोनात हाल झाले. सीएसएमटी-सावंतवाडी गणपती स्पेशल तब्बल 16 तास उशिराने धावल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. अन्य 18 रेल्वेगाड्यांच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचाही गणेशभक्तांना फटका बसला.

Advertisement

कोकण मार्गावर मध्य, कोकण व पश्चिम रेल्वेने गणपती स्पेशलच्या 317 फेऱ्या जाहीर करत चाकरमान्यांना दिलासा दिला असला तरी सर्वच रेल्वेगाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने चाकरमान्यांना लटकंतीचा प्रवास करावा लागत आहे. रेल्वेगाड्यांमध्ये बसण्यासाठी जागाच मिळत नसल्याने प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागत आहे. त्यात गणपती स्पेशल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांच्या मनस्तापात आणखी भर पडत आहे. तासन्तास लटकंतीचा अन् रेटारेटीचा प्रवास करताना गणेशभक्तांची दमछाक होत आहे.

Advertisement

गेल्या 3 दिवसांपासून कोकण मार्गावरून धावणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांचे वेळापत्रक पुरते बिघडले आहे. कोकण रेल्वेच्या एकाच मार्गावर जादा गणपती स्पेशल गाड्यांची संख्या वाढल्याने अनेक स्थानकांमध्ये रेल्वेगाड्या क्रॉसिंगसाठी थांबत असल्याने रेल्वेगाड्यांना ‘लेटमार्क’ मिळत आहे. ही परिस्थिती आणखी 2 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून बिघडलेले वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू असले तरी जादा गणपती स्पेशलसह एकाच ट्रॅकमुळे वेळापत्रक पूर्वपदावर येण्याची सूतरामही शक्यता नाही.

शुक्रवारीही गणपती स्पेशलसह 18 रेल्वेगाड्यांना लेटमार्क मिळाला. सीएसएमटी-सावंतवाडी 2 तास 30 मिनिटे, दादर-सावंतवाडी 2 तास 50 मिनिटे, मडगाव-नागपूर स्पेशल 3 तास 25 मिनिटे, सीएसएमटी-सावंतवाडी 2 तास 40 मिनिटे विलंबाने धावल्याने चाकरमान्यांची रखडपट्टी झाली. सावंतवाडी-एलटीटी गणपती स्पेशलही 2 तास उशिराने रवाना झाली. अन्य 2 गणपती स्पेशल गाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला. मंगळूर-उधना 1 तास, दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस 2 तास 20 मिनिटे, सीएसएमटी-मंगळूर एक्स्प्रेस 1 तास 50 मिनिटे, कोच्युवेली-एलटीटी गरीबरथ एक्स्प्रेस 2 तास, एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस 1 तास विलंबाने धावल्या. मत्स्यगंधा एक्स्प्रेसलाही 4 तासांचा लेटमार्क मिळाला. वेरावल-तिरूवअनंतपूरम एक्स्प्रेस 1 तास 40 मिनिटे, तर सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस 1 तास 50 मिनिटे उशिराने धावली. हिस्सार-कोईमतूर वातानुकूलित स्पेशललाही 3 तास 30 मिनिटांचा लेटमार्क मिळाला.

Advertisement
Next Article