‘तेरा यार हूं मैं’ चित्रपट येतोय
मिलाप जावेरीकडून दिग्दर्शन
मागील वर्षी ‘एक दीवाने की दीवानियत’ यासारखा रोमँटिक चित्रपट सादर करणारा दिग्दर्शक मिलाप जावेरी आता आणखी एक रोमँटिक चित्रपट ‘तेरा यार हूं मैं’ घेऊन येत आहे. या चित्रपटातून दिग्दर्शक इंद्र कुमार यांचा पुत्र अमन इंद्र कुमार बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. निर्मात्यांनी आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यानुसार 31 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अमनसोबत या चित्रपटात आकांक्षा शर्मा ही अभिनेत्री दिसून येणर आहे. हा चित्रपट प्रेम, ड्रामा, कॉमेडी आणि अॅक्शनने भरपूर सांगितिक प्रेमकथा असणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लुक जारी केला आहे. यात अमन आणि आकांत्रा दिसून येत आहेत. आतापर्यंत चित्रपटाच्या कहाणीविषयी अधिक माहिती समोर आलेली नाही.
मिलापकडून दिग्दर्शित ‘मस्ती 4’ हा चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला होता. तर ‘एक दीवाने की दीवानियत’ या त्याच्या चित्रपटाने मोठी चर्चा मिळविली होती. आता मिलाप ‘तेरा यार हूं मैं’सोबत एक नवी प्रेमकथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.