‘ओह माय डॉग’ चित्रपट येतोय
माणूस अन् श्वानांमधील नात्याची खास झलक
अमित राय स्वत:चा पुढील चित्रपट ‘ओह माय डॉग’ घेऊन येत आहे. यापूर्वी त्याने ‘ओह माय गॉड 2’चे दिग्दर्शन केले होते. त्याच्या या नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून यात माणूस अन् श्वानांदरम्यान बिनशर्त प्रेम अन् निष्ठेच्या एका कहाणीची झलक दिसून येते.
टीझरची सुरुवात अमिताभ बच्चन यांचे प्रसिद्ध गीत ‘मेरे पास आओ मेरे दोस्तों, एक किस्सा सुनो’ने होते. हा टीझर कहाणीची निरागसता, आपलेपणा आणि भावनात्मक खोलीला सुंदरपणे दाखवितो. हा चित्रपट 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘ओह माय डॉग’ चित्रपटात माही राय, पंकज त्रिपाठी, गीता अग्रवाल शर्मा, राजेश कुमार, पवन मल्होत्रा, सुलक्षणा बरुआ आणि विजय मिश्रा दिसून येणार आहेत. या चित्रपटात 250 हून अधिक श्वान आहेत, हा चित्रपट एक मुलगा आणि श्वानामधील सुंदर नात्याची मनस्पर्शी कहाणी दाखविणारा आहे. या चित्रपटाची निर्मिती अमित राय, राजेश भारद्वाज आणि सना वारसी यांनी केली आहे.