For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नागबंधम’ चित्रपट येतोय

06:31 AM Jun 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘नागबंधम’ चित्रपट येतोय
Advertisement

दक्षिणेत पुन्हा एकदा नवी कहाणी पडद्यावर सादर होणार आहे. मागील काही काळापासून ‘नागबंधम’वरून मोठी चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. तसेच याचा टीझर प्रदर्शित करण्यात आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Advertisement

या चित्रपटाच्या पोस्टरमधील सर्व कलाकारांच्या भूमिका दिसून येत आहेत. या पोस्टरमध्ये विराट कर्ण, ऋषम साहनी, नाभा नतेश आणि जगपति बाबू यांच्यासमवेत पूर्ण स्टारकास्ट एकाचवेळी पॉवरफुल फ्रेममध्ये दिसून येत आहे. या नव्या पोस्टरला पाहून प्रत्येक भूमिकेमागे कुठलेतरी रहस्य आणि दडलेली कहणी असल्याचे जाणवते. ऋषभने यात अब्दालीची भूमिका साकारली असून याकरता त्याने हिंदी आणि तेलगू दोन्ही भाषांमध्ये डबिंग केले आहे. तसेच याकरता त्याला तलवारबजी शिकण्यासोबत ‘पश्तो’ भाषेचे प्रशिक्षण घ्यावे लागले आहे.

या चित्रपटाच्या गाण्यांना श्रोत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ‘नमो रे’ गाण्याने युट्यूबवर 10 दशलक्ष ह्यूजचा आकडा ओलांडला आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा पाहत आहेत. हा चित्रपट देशभरात एकाचवेळी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.