‘मिसेस’ चित्रपट 7 फेब्रुवारीला येणार
सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत
आरती कदव यांच्याकडून दिग्दर्शित चित्रपट ‘मिसेस’ प्रत्येक महिलेशी जोडली जाणारी कहाणी मांडणारा आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्राने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये सादरीकरण करण्यात आले, जेथे त्याचे कौतुक झाले आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे.
जी5ने आरती कदवकडून दिग्दर्शित चित्रपट मिसेसच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. हा चित्रपट 7 फेब्रुवारीपासून पाहता येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला असून यात एका महिलेच्या संघर्षाची कहाणी दिसून येते. यात पितृसत्ताक मानसिकतेशी लढत एक महिला कशाप्रकारे स्वत:ची स्वप्ने पूर्ण करते हे यात दाखविण्यात आले आहे.
चित्रपटाची कहाणी ऋचा (सान्या) या युवा वधूची आहे. ती विवाहानंतर घरगुती कामांमध्ये गुंतून पडते, प्रत्यक्षात तिला नृत्यांगना होण्याची आवड असते. घराच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिची स्वप्ने मागे पडतात. मग ती स्वत:च्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा विचार करते, परंतु तिच्या घरातील ज्येष्ठांची मानसिकता तिच्यासमोर अडथळे निर्माण करते.
मिसेस या चित्रपटाची कथा वाचल्यावर मी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी उत्सुक झाले होते. चित्रपटात महिलांकडून केली जाणारी दैनंदिन कामे आणि संघर्षाला दर्शविण्यात आले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रेरित करेल अशी अपेक्षा असल्याचे उद्गार सान्याने काढले आहेत. मिसेस सारखा चित्रपट तयार करणे प्रत्यक्षात एक पुरस्कार मिळविण्यासारखा अनुभव राहिला असल्याचे दिग्दर्शिका आरती कदव यांनी म्हटले आहे.