For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लव लॉटरी’ चित्रपट येतोय

06:19 AM Sep 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘लव लॉटरी’ चित्रपट येतोय
Advertisement

आगामी सस्पेंस थ्रिलर अन् सोशल कोर्टरुम ड्रामापट ‘लव लॉटरी’चा ट्रेलर जारी करण्यात आला आहे.  सिनेमा गंज फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत निर्मित या चित्रपटात आधुनिक नातेसंबंध, विवाह, विश्वासघात आणि त्याच्याशी निगडित कायदेशीर वादांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. याचबरोबर पुरुषांच्या अधिकारांच्या मुद्द्याला नाट्यामय पद्धतीने यात सादर करण्यात आले आहे.

Advertisement

आधुनिक नात्यांच्या झगमगाटामागे अविश्वास, छळ आणि भावनात्मक संघर्ष लपलेले असतात याची जाणीव हा ट्रेलर करून देतो. याच्या कहाणीत विवाह, घटस्फोट, विश्वासघात आणि पैशांच्या आमिषापोटी करण्यात आलेल्या विवाहाचे प्लॉट समोर येतात.

अक्षय ओबेरॉय या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची कहाणी प्रेम, विश्वास, संशय आणि न्यायाच्या लढाईच्या अवतीभवती घुटमळणारी आहे. हेली दारुवाला आणि इतर कलाकारही लक्ष वेधून घेतात. ट्रेलर पाहून अखेर नात्यामध्ये नेमकं काय घडलं? कोण खरं बोलतोय असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत आहेत. हा चित्रपट 18 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.