कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘दे दे प्यार दे 2’ चित्रपट येतोय

06:40 AM Oct 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह यांचा ‘दे दे प्यार दे’ चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता अजय याचा सीक्वेल घेऊन येत आहे. चित्रपटाचे नाव ‘दे दे प्यार दे 2’ ठेवण्यात आले आहे. याचे मोशन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात अजय हा स्वत:पेक्षा 21 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement

‘दे दे प्यार दे 2’ हा चित्रपट प्रीक्वेलप्रमाणेच कॉमेडी धाटणीचा असेल, ज्यात मोठा ड्रामा आणि फॅमिली अँगल असणार आहे. पोस्टरवर रकुल प्रीत सिंहचा परिवार अजय देवगणला कारमधून बाहेर फेकताना दिसून येत आहे. यातून यावेळी मोठा ड्रामा दिसून येणार असल्याचे संकेत मिळतात. चित्रपटात अजय देवगणने आशीष तर रकुलने आएशा ही भूमिका साकारली आहे. यावेळी आशीषसमोर आएशाच्या परिवाराचा होकार मिळविण्याचे आव्हान आहे. हा चित्रपट 14 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून यात प्रेम विरुद्ध परिवाराची लढाई दिसून येणार आहे. चित्रपटात आर. माधवन, मीजान जाफरी, गौतमी कपूर, इशिता दत्ता आणि जावेद जाफरी हे कलाकार देखील आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंशुल शर्मा यांनी केले असून कृष्ण कुमार, लव रंजन आणि भूषण कुमार याचे निर्माते आहेत.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article