‘बैदा’ चित्रपट लवकरच येणार
चायपत्ती आणि चिंता मणि यासारख्या हॉरर कॉमेडीद्वारे धमाल करणारी जोडी फिल्ममेकर सुधांशू राय आणि दिग्दर्शक पुनीत शर्मा यावेळी रोमांचच्या बूस्टर डोससोबत परतणार आहेत. या दोघांनी स्वत:चा नवा चित्रपट ‘बैदा’ची घोषणा केली आहे. हा चित्रपट हिंदी हार्टलँडच्या पार्श्वभूमीवर आधारित अनोखी साय-फाय सुपरनॅचरल थ्रिलर धाटणीचा आहे.
या चित्रपटात सौरभ राज जैन, हितेन तेजवानी आणि तरुण खन्ना हे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बैदा एक संपूर्ण मनोरंजक चित्रपट असून यात काही असाधारण व्यक्तिरेखांची रंजक कहाणी आहे. बैदासोबत न ऐकलेल्या अन् अकल्पनीय कहाणींचा संसार आणखी मोठा होणार असल्याचे सुधांशु राय यांनी म्हटले आहे.
भारतीय प्रेक्षक वेगाने आउट-ऑफ-द-बॉक्स संकल्पना आणि अनोख्या कहाण्या पसंत करत आहेत. बैदा या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल असा आम्हाला विश्वास असल्याचे दिग्दर्शक पुनीत शर्मा यांनी म्हटले आहे.