कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयएसच्या पिलावळींची वळवळ !

06:29 AM Oct 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संपूर्ण जगाला आयएस या दहशतवादी संघटनेने अजगरी विळखा घातला आहे. मात्र देशातील तपास यंत्रणांनी आयएसच्या भस्मासुराला सुऊंग लावलाय. त्यातूनही आयएसच्या पिलावळींची मुंबई-पुणे सारख्या शहरात वळवळ सुऊ असून, त्यांची नांगी ठेचण्याचे काम तपास यंत्रणांनी हाती घेतले आहे.

Advertisement

देशातील जागतिक केंद्र अशी मुंबईची ख्याती. यामुळे मुंबई हे सातत्याने चर्चेत असलेले शहर. मात्र गेल्या काही दिवसापासून मुंबईबरोबरच विद्येचे माहेरघर आणि उद्योगांचे केंद्र असलेले पुणे शहराने देशाच्या पटलावर सर्वांचे लक्ष वेधू लागले आहे.  गुन्हेगारी आणि दहशतवाद्यांचे नवे आश्रयस्थान अशी पुण्याची ओळख निर्माण होतेय. हगवणे प्रकरण असो की, पुजा खेडकर प्रकरण असो की सध्याचे निलेश घायवळ प्रकरण. हे कमी की काय तोच जागतिक स्तरांवर आपला अजगरी विळखा आवळण्याच्या प्रयत्नात असलेल्या आयएसने पुण्यातदेखील आपला तळ निर्माण करण्यास सुऊवात केली. मात्र तपास यंत्रणांनी वेळीच आयएसची नांगी ठेचून काढली. तरीही आयएसच्या पिलावळीची वळवळ सुऊच आहे.

Advertisement

याच आयएसच्या पिलावळीवर नजर ठेऊन असलेल्या राज्य एटीएसने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 19 ठिकाणी छापेमारी केली. पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त घेत राज्य एटीएसने आयएसच्या अ•dयांवर छापेमारी केली. तपासादरम्यान संशयितांकडून डिजिटल साहित्य, दस्तऐवज आणि संभाव्य पुरावे जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, हे सर्व 2023 साली उघडकीस आलेल्या ‘आयएस मॉड्यूल’ प्रकरणाशी संबंधित आहेत. म्हणजेच, पुणे हे केवळ माहिती तंत्रज्ञानाचे पेंद्र नाही तर दहशतवादी संघटनांनी त्यांच्या जाळ्यासाठी निवडलेले संभाव्य ठिकाण बनत आहे, हे चिंताजनक आहे. मात्र तपास यंत्रणांच्या नजरेतून कोणतीही गोष्ट चुकत नाही, हे अनेकदा दिसून आले आहे. यापूर्वी नुकताच मृत्यू झालेल्या साकीब नाचनने तर अगदी मुंबईच्या शेजारी असलेल्या पडघा गावाला अल शाम म्हणून घोषीत केले होते. भिवंडीतील या गावात स्वत:चे असे 26 जणांचे सरकार अस्तित्वात आणले होते. साकीबच्या सर्व हालचालीवर एनआयएमध्ये असलेले तत्कालीन अतिरिक्त महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांची करडी नजर होती. त्याच्याविरोधात भक्कम पुरावे मिळताच अतुलचंद्र कुलकर्णी यांनी संपूर्ण एनआयएची टीम भिवंडीत उतरविली. पडघा गाव साखरझोपेत असतानाच एनआयएने ताबा घेत साकीबसह त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. यामागे देखील 2023 साली पुणे येथे पर्दाफाश केलेल्या आयएस मोड्यूलचाच संदर्भ होता. पुणे येथून पकडलेल्या आयएस संशयीतांच्या चौकशीतूनच हे धक्कादायक वास्तव समोर आले होते. या प्रकरणाचा तपास सुऊ असतानाच  पुन्हा एकदा पुणे येथे आयएसचे धागेदोरे असल्याचे एटीएसच्या निदर्शनास आले. त्यातून ही छापेमारी करण्यात आली. नेमके देशात आयएसने शिरकाव कशाप्रकारे केला हे पाहणे आवश्यक आहे. कालांतराने आयएसच्या शिरकावाबाबत अनेकदा अनभिज्ञता असल्याने त्याची उजळणी करणे आवश्यक आहे.

इराक आणि सिरीया यातील यादवी युद्धाचा फायदा उचलत आयएसने त्याठिकाणी आपले बस्तान बसविले होते. तर संपूर्ण जगातून आयएससाठी मोठ्या प्रमाणात तरूणांची भरती सुऊ होती. अशाच प्रकारची भरती राज्यात सुऊ असल्याची माहिती एनआयएला मिळाली. त्यांनी तत्काळ कारवाई करत आयएसच्या भस्मासुराला सुऊंग लावला. मात्र तपासाअंती पकडल्या गेलेल्या संशयीतांनी मोठ्या प्रमाणात आयएसमध्ये तरूणांचे ब्रेन वॉश करीत भरती करण्याचा सपाटा सुऊ लावल्याचे समोर आले होते. त्यावेळी मुंबई आणि पुणे येथे एनआयएने छापेमारी करत आयएसच्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. आयएसचा प्रमुख अबु अल बगदादी आणि अबु अल हुसैन अल कुरेशी यांनी आयएसची दहशत आणि धास्ती वाढविण्यासाठी संपूर्ण जगातील अनेक राष्ट्रात मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यास सुऊवात केली. यासाठी त्यांनी अनेक देशातील तरूणांचे ब्रेन वॉश करत त्यांची भरती करण्यास सुऊवात केली होती. त्यातच 2015 साली राज्यातील प्रथमच चौघेजण आयएसमध्ये भरती होण्यासाठी गेल्याची बातमी बाहेर आल्याने, संपूर्ण देशात खळबळ माजली होती. कल्याणमधील चौघे जण इराकला गेल्यानंतर त्यातील एकजण तेथील दाहकता पाहून परत फिरला. इराकमध्ये गेलेला कल्याणमधील आरिफ माजीद तपास यंत्रणांच्या मदतीने शहरात आला होता. आरिफच्या चौकशीतून बाहेर आलेली माहिती आणि आयएसचा ट्विटर हँडलरला बेंगळूरमधून केलेली अटक. हे पाहता शहरातील कित्येक तरूण आयएसच्या संपर्कात असल्याचे वास्तव समोर आले होते. सतर्क झालेल्या तपास यंत्रणांनी देशातील आयएसची पाळेमुळे खणून काढण्यास सुऊवात केली.

आयएसकडे देशातील उच्चशिक्षित तरूण वळत असल्याने, तपास यंत्रणांसमोर या तरूणांना रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. यादरम्यान आयएसने ट्विटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणांत तरूणांचे ब्रेन वॉश करण्यास सुऊवात केली होती. विशेष म्हणजे आरिफच्या चौकशीत इराकमध्ये असताना आयएसचे ट्विटर अकाऊंट देशातून हँडल होत असल्याची माहिती समोर आली होती. यावेळी तपास यंत्रणांनी तत्काळ आयएसचा ट्विटर हँडलर मेहदी बिस्वास याला अटक केली. दिवसा नोकरी आणि रात्री आयएसकरीता ट्विटर हँडलिंग असे मेहदीचे काम सुऊ होते. मात्र मेहदीच्या अटकेची बातमी मिळताच, आयएस पेटून उठली होती. मात्र तपास यंत्रणांनी देशाची सुरक्षा एवढी चोख ठेवली होती की, आयएसच्या दहशतवाद्यांचा केवळ देशाबाहेरच थयथयाट सुऊ होता. तर दुसरीकडे आरिफच्या सर्वच माहितीवर एनआयए विश्वास ठेऊ शकत नाही. कारण एनआयएला गुमराह करण्यासाठी आरिफ कोणतीही माहिती देण्याची शक्यता होती.

यादरम्यान, एनआयए आणि राज्य एटीएस सक्रीय होत त्यांनी कल्याण, भिवंडी आणि पनवेल या ठिकाणी लक्ष केंद्रीत केले होते. त्या अनुषंगाने एटीएसने 480 जणांची चौकशी केली होती. यामध्ये उच्चशिक्षित तरूणांसह नवी पनवेल येथील महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापकाचा देखील समावेश होता. या सव् ा&ंना एटीएसने यापूर्वीच ताब्यात घेतले होते. नेमकी 2015 सारखीच परिस्थिती समोर आली होती. एनआयए-राज्य एटीएसने मुंबई, ठाणे, भिवंडी, पुणे येथे छापे मारत साकीब नाचनसह अनेक आयएस दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यातच नाचनचा मृत्यू झाल्याने आयएस आणि त्यांच्या पाठिराख्यांना हा मोठा धक्का होता. आयएसच्या हालचाली थंडावतील असा व्होरा असतानाच आयएसच्या पिलावळींची अद्यापही वळवळ सुऊ असल्याचे समोर आले. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राज्य सुरक्षित आहे. त्यांचे अगदी बारीक-सारीक गोष्टीवर लक्ष असल्यानेच दहशतवाद्यांचे मनसुबे अस्तित्वात येण्यापूर्वीच उधळून लावले जात आहेत. सध्या फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांसह राज्य पोलिस, एटीएस, फोर्स वनची आधुनिकतेकडे वाटचाल सुऊ आहे. यामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरात वळवळ करणाऱ्या आयएसच्या पिलावळींची नांगी ठेचण्याची हीच योग्य वेळ आहे.

अमोल राऊत

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article