For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाचा दणका! सातारा पालिका खड्डे बुजवण्याच्या लागली कामाला

02:54 PM Aug 24, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाचा दणका  सातारा पालिका खड्डे बुजवण्याच्या लागली कामाला
Advertisement

सातारा :शहरातील खड्डे बुजवण्यासाठी दिव्यांग संघटनेने खड्डे बुजवा आंदोलन केल्यानंतर करत पालिकेचे लक्ष वेधून घेतले होते. त्या आंदोलनाची दखल घेवून पालिकेच्या वतीने खड्डे बुजण्याची मोहिम हाती घेतली आहे. समर्थ मंदिर ते बोगदा या रस्त्यावरचे खड्डे रविवारी बुजवण्याची कार्यवाही सुरु होती.

Advertisement

शिवतीर्थ परिसर आणि महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या समोरपडलोले खड्डे दिव्यांग संघटनेने बुजवून सातारा पालिकेचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सातारा पालिकेच्या प्रशासनाने दखल घेवून शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. त्यासाठी पावसाळी डांबर उपलब्ध करण्यात आले होते. रविवारी बोगदा ते समर्थ मंदिर या रस्त्यावरचे खड्डे मुजवण्यात आले. शहरातील इतर रस्त्याचेही खड्डे मुजवण्यात येणार असल्याचे सातारा पालिकेच्या बांधकाम विभागातून सांगण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.