For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रहांची चाल आणि आयुष्यातली धमाल!!!

06:06 AM Apr 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
ग्रहांची चाल आणि आयुष्यातली धमाल
Advertisement

 ग्रहांबद्दल किंवा ज्योतिषातील क्लिष्ट मुद्यांवरती मी लिहायचे टाळतो. कारण सगळ्या लोकांना ग्रहांबद्दल किंवा गोष्टीबद्दल किंवा एकंदरच ज्योतिष शास्त्राबद्दल पूर्ण माहिती नसते आणि अर्धवट माहिती खूप धोकादायक असते. पण झाले असे आहे की, टीव्ही, फेसबुक, व्हॉट्सअप महाविद्यालयात ज्योतिषाबद्दल आणि ज्योतिषसंबंधित विषयांबद्दल अनेक मिम्स, व्हीडिओज आणि मेसेजेस फिरत असतात. हे असले काहीबाही बघून कित्येकदा माणूस घाबरतो किंवा एक्साईट होतो. यातून नको तो प्रकारही घडू शकतो. ज्योतिषीय भाषेत बोलायचे तर एप्रिल महिन्यात बऱ्याच खगोलीय घटना घडताना दिसतात. 6 एप्रिलला शुक्र स्वत:च्या वृषभ राशीत प्रवेश करता झाला आहे. 14 एप्रिलला सूर्य आपल्या उच्च राशीत म्हणजे मेषेत आला. 21 एप्रिलला बुध मेषेतच वक्री होईल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बारा वर्षानंतर 22 एप्रिलला गुऊ स्वत:ची मीन रास सोडून मेषेतच प्रवेश करेल. लक्षात घ्या, गुऊ आपल्या मित्राच्या राशीत जरी प्रवेश करत असला आणि तो ज्ञानाचा, शुभतेचा, सात्विकतेचा जरी कारक असला तरी आपल्या घरातून तो अशा घरी प्रवेश करत आहे, इथे ऑलरेडी राहू नावाचा टेररिस्ट, गुंड बसला आहे. याला गुऊ चांडाळ योग असे म्हणतात. रवी मेषेत गेल्यानंतर काही दिवसांनी ग्रहण योग होईल. 23 एप्रिलला बुधाचा अस्त होईल आणि 27 एप्रिलला गुऊचा उदय झाल्यानंतर मंगल कार्यालयवाल्यांना आनंद होईल कारण एप्रिलमध्ये विवाह मुहूर्त नव्हते. या सगळ्याचा आपल्यावर काय परिणाम होणार, असा जर प्रŽ तुमच्या मनात आला तर यावेळचे राशिभविष्य हे साप्ताहिक नसून या ग्रहांच्या राशी परिवर्तनावर आधारित आहे, हे लक्षात घ्या. या ग्रह युद्धामध्ये सगळ्यांना करता येतील, असे उपाय खाली देत आहे. यातील कोणतेही उपाय जमेल तसे तुम्ही करू शकता.

Advertisement

1. कोणाकडूनही दान घेऊ नका. 2. आपल्या नशिबावर विश्वास ठेवा. 3. गायीची सेवा करा. 4. दिव्यांग व परजातीच्या लोकांना मदत करा. 5. वाहत्या पाण्यात बदाम आणि नारळ अर्पण करा. 6. केशराचा टिळा कपाळाला लावा. 7. नाक व दात स्वच्छ ठेवा. 8. सोने, पुष्कराज, काशाचे भांडे, साखर, शुद्ध तूप, पिवळ्या रंगाचे वस्त्र, हरभऱ्याची डाळ, हळद, पुस्तके, वस्तूंचे दान करा. 7. गरजूंना शैक्षणिक मदत करा. 8. दुसऱ्याचे सतत शुभचिंतनच करा. 9. पिवळ्या कापडात हळदीची गाठ ठेवून मंदिरात दान करा. 10. घरासमोर ख•s असतील तर ते त्वरित बुजवा. 11. सदाचाराला अत्यंत महत्त्व द्यावे. 12. मोकळ्या जागेत मोठ्या झाडाखाली थोड्या थोड्या प्रमाणात सप्त धान्य ठेवा. यामध्ये बाजरी, गहू यांचा समावेश आवश्यक. 13. गंगाजल आपल्याजवळ सतत ठेवा. 14. रात्रीचे जेवण झाल्यावर घरातल्या गॅसवर दूध शिंपडा. 15. धार्मिक कार्य सतत करीत रहा. 16. खोटी साक्ष देऊ नका. 17. तुरटीने दात साफ करा. 18. कुमारिकांचा आशीर्वाद घ्या. 19. घरातून बाहेर पडताना घरातील देवपूजेचे निर्माल्य बरोबर घेत जा. 20. जुगार किंवा तत्सम प्रकारच्या वाटेला जाऊ नका.

मेष-

Advertisement

 काही काळापासून मनाची होणारी चलबिचल कमी होईल. संततीसंबंधी प्रŽ सुटतील. भाग्याची साथ मिळेल. तीर्थयात्रेचे योग आहेत. कौटुंबिक वाद कमी होतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर असलेले संबंध सुधारतील. जितके धार्मिक रहाल, तितका फायदा असेल. लांब राहणाऱ्या व्यक्तींशी संबंध जुळतील. व्यवसायात प्रगती संभवते. व्यावसायिक मित्रांपासून लाभ होईल. खर्चाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करा.

वृषभ-

मुळात आकर्षक असलेले व्यक्तिमत्त्व आणखी प्रभावी होईल. कुटुंबामध्ये लहान सहान कारणाकरता वाद होऊ नयेत याची काळजी घ्यावी. सासरच्या मंडळींना थोडा त्रास संभवतो. मित्रांमुळे नुकसान होण्याची शक्मयता असेल. मोठ्या भावाला किंवा बहिणीला तब्येतीचा त्रास होऊ शकतो. उत्पन्न वाढवण्याकरता जोड व्यवसायाचा विचार कराल. आर्थिक बाबतीत समाधानकारक वातावरण असेल. शत्रु नामशेष होतील.

मिथुन-

चिडखोर स्वभाव नसला तरी या काळात रागाचे प्रमाण वाढलेले दिसेल. डोक्मयावर लहान, मोठी जखम होऊन व्रण येऊ शकतो. आईच्या तब्येतीला सांभाळावे लागेल. जमिनीसंबंधी वाद वाढू शकतात. व्यवसायात आर्थिक प्राप्तीकरता जास्त मेहनत घ्यावी लागेल. अपघातापासून सावध रहा. लाभामध्ये कमी-जास्त पण आल्यामुळे थोडे नाराज व्हाल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांमुळे फायदा होईल

 कर्क-

व्यावसायिक निर्णय घेताना अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. चुकीचा सल्ला किंवा राहण्याने नुकसान होऊ शकते. या काळात जमिनीच्या व्यवहारासंबंधी काही निर्णय घेण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा. मातृ चिंता वाढेल. स्त्री वर्गाकडून लाभाची शक्मयता जास्त आहे. व्यावसायिक कामांकरता कर्ज घ्यावे लागू शकते. नोकरदार वर्गाला साधारणपणे अनुकूल काळ आहे. शेअर बाजारापासून दूर रहा.

सिंह-

स्वत:च्या पराक्रमाने चांगल्या प्रमाणात लाभामध्ये वाढ कराल. संगतीच्यादृष्टीने हा काळ तितकासा अनुकूल नाही. मित्रांवर जास्त भरोसा करणे टाळावे. संततीसंबंधी काही प्रश्न! निर्माण झालेतरी नंतर ते निकालात लागतील. स्थावर मालमत्ता किंवा प्रॉपर्टीसंबंधी शुभ घटना घडण्याची शक्मयता आहे. नोकरीत काही काळ तणाव असलातरी नंतर फायदा होईल. व्यावसायिकांना अनपेक्षित फायदा होण्याची शक्मयता आहे

कन्या-

शारीरिक व्याधी काही काळ त्रास देऊ शकतात. फायनान्स किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना विशेष करून सावध रहावे लागेल. काही काळ कौटुंबिक वातावरणातसुद्धा तणाव जाणवू शकतो. प्रेम प्रकरणांमध्ये सावध रहा, बदनामीचे योग आहेत. व्यावसायिक संबंध ताणले जाऊ नयेत याची काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या तब्येतीला जपावे लागेल. धार्मिक कार्ये घडतील.

तूळ-

काहीसे संमिश्र्र ग्रहमान असेल. गेली काही वर्षे तब्येतीच्या आणि इतर काही तक्रारी त्रास देत होत्या, त्या कमी होतील. वैवाहिक जीवनात मात्र चढउतार पहायला मिळेल. सासरकडच्या मंडळींकडून फायदा संभवतो. प्रत्येक कामात यश मिळेल आणि लाभ होईल, अशी अवाजवी अपेक्षा मात्र करू नका. सध्याचा काळ हा असलेल्या संधींचा फायदा उचलण्याचा आणि संयम ठेवण्याचा आहे, हे ध्यानी असू द्या.

 वृश्चिक-

येणाऱ्या काळामध्ये तब्येतीला सांभाळावे लागेल. कोणतेही धोकादायक काम करण्याच्या भानगडीत पडू नका. शक्मयतो एकट्याने प्रवास करणे टाळा. शत्रूंवर विजय मिळवाल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. संततीविषयी काळजी करण्यासारखे काही नसले तरी आपल्या परीने शक्य ते सारे करावे लागेल. कौटुंबिक वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत चांगले अनुभव येऊ शकतात.

 धनु -

आपल्या इच्छावर, आकांक्षांवर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे असेल. संगतीविषयी थोडी काळजी वाटू शकते. कलाकारांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. स्वत:च्या कर्तृत्वाने धनप्राप्ती होईल. मन भूक, भोगविलासाकडे जास्त वळू शकते. बरेच दिवस जी आंतरिक घुटमळ होत होती, ती संपेल. लहान मोठ्या कामांमध्ये अपयश मिळण्याच्या काळाला विराम मिळून चांगली यशप्राप्ती होण्याची शक्यता आहे.

 मकर-

संघर्षाचा काळ असल्याने उपासनेला वाढवावे लागेल. त्याचबरोबर संयम आणि धैर्य किंवा श्र्रद्धा आणि सबुरी याची कास धरा. प्रयत्नवादाची कास धरल्यास यश मिळेल. प्रॉपर्टीसंबंधी काही प्रश्न! असल्यास त्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. मातृ चिंतेचा काळ आहे. व्यावसायिक प्रगती होईल. समाजामध्ये मान-सन्मानात वाढ होईल. व्यावसायिकांना अचानक तेजी-मंदीचा अनुभव येऊ शकतो.

कुंभ-

काळ सुसह्य होत असला तरी सगळे निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचे असेल. लहान भावंडांच्याबाबतीत काही विचित्र अनुभव येऊ शकतात. प्रवास करत असताना सगळ्या बाजूने विचार करून आणि सावधानता बाळगून करणे गरजेचे असेल. कामाच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणाने राहत्या ठिकाणाहून दूर जाण्याची शक्मयता आहे. कागदपत्रांच्या व्यवहारात सावध रहा, चूक राहू देऊ नका.

मीन-

गुऊचा पाठिंबा कमी होत असल्याने अडचणींमध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. सगळ्या बाजूने सावध राहण्याची गरज आहे. कोणत्याही भुलभुलैयाला बळी पडू नका. कौटुंबिक वातावरण संमिश्र्र असेल. कधी कुटुंबामध्ये एकमत असेल तर काही वेळेला वादविवाद होतील. प्रॉपर्टीसंबंधी निर्णय चुकण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. धनसंचयाकडे लक्ष द्या.

Advertisement
Tags :

.