For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा ग्रामस्थांच्या आंदोलनाला अखेर यश

05:37 PM Jun 17, 2025 IST | अनुजा कुडतरकर
आचरा ग्रामस्थांच्या आंदोलनाला अखेर यश
Advertisement

आचरा वीज वितरणसाठी अधिकारी झाले नियुक्त

Advertisement

आचरा | प्रतिनिधी
आचरा बाजारपेठेत दुकानाच्या शेडवर चालू विद्युत वाहिनी पडल्याची घटना घडली होती. याची दखल घेण्यासाठी कोणताही सक्षम अधिकारी, कर्मचारी नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच जेरोन फर्नांडीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले होते. चार तास चाललेल्या या आंदोलनात अधिकाऱ्यांना रोखून धरले होते . आंदोलन स्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व दिपक पाटकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती व वीज वितरणला सक्षम अधिकारी, लाईनमन देण्याची मागणी लावून धरली होती. या आंदोलनास यश आले असून सहाय्यक अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने मा.कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांच्यामार्फत आचरा उपविभागा अंतर्गत सहाय्यक अभियंता शाखा कार्यालय आचरा व शाखा कार्यालय विरण करिता सहाय्यक अभियंता यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच शाखा कार्यालय आचरा करिता प्रधान तंत्रज्ञ यांची ही नियुक्ती आज किंवा उद्यापर्यंत करण्यात येईल असे सरपंच जेरोन फर्नांडीस यांना वीज वितरण कडून कळवण्यात आले. व नेमणूकीची प्रत विभागाकडून सरपंच यांना पाठवण्यात आली. मंगळवारी सायंकाळी आचरासाठी नियुक्त करण्यात आलेले सहाय्यक अभियंता सौरभकुमार वर्मा यांनी चार्ज हाती घेतला आहे यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपसरपंच संतोष मिराशी,आचरा व्यापारी संघटना उपाध्यक्ष परेश सावंत, मंदार सांबारी, खजिनदार जयप्रकाश परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, चंद्रकांत कदम,महेंद्र घाडी, मंदार सरजोशी, अभिजीत सावंत, अभय भोसले, सिद्धार्थ कोळगे, निखिल ढेकणे, किशोर आचरेकर, आबा आंबेरकर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत साहेब यांच्या विशेष प्रयत्नांमुळे यश प्राप्त झाले असल्याचे सरपंच यांनी सांगत ग्रामस्थ व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत साहेब यांचे आभार मानलेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.