जगातील सर्वात अनोखी परंपरा
जन्माला न येऊ शकलेल्यांबद्दल करतात शोक
एक मुल गमावणे अत्यंत वेदनादायी असते, भले मग ते मूल जन्माला का आलेले नसो. गर्भपात किंवा अन्य कारणामुळे स्वत:चे मूल गमावणाऱ्या पालकांचे दु:ख शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. अशा जोडप्यांसाठी जपानमध्ये मिझुको कुयो नावाचे अनुष्ठान आहे. ही परंपरा स्थानिक लोक शतकांपासून निभावत आले असून यात जन्मापूर्वीच मृत्यू झालेल्या मुलांबद्दल शोक व्यक्त केला जातो. यामागील कारण तितकेच दु:खदायक आहे.
जपानमध्ये गर्भपात, मिसकॅरेज किंवा बळजबरीने गर्भपात किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे भ्रूण गमावल्यास शोक व्यक्त करण्यासाठी पारंपरिक बौद्ध समारंभ होतो, ज्याला मिजुको कुयो म्हटले जाते. याचा शाब्दिक अर्थ वॉटर चाइल्ड मेमोरियल सर्व्हिस आहे. पूर्ण जपानमधील मंदिरांमध्ये आणि लोकांच्या घरांमध्ये खासगी स्वरुपात हा विधी पार पाडला जातो.
जपानमधील परंपरेच्या मान्यतेनुसार जे मूल जन्माला येण्यापूर्वी मृत्युमुखी पडते, ते थेट स्वर्गात जात नाही, कारण त्याला कधीच चांगले कर्म अर्जित करण्याची संधी मिळालेली नसते, यामुळे अशा मुलांना सानजू नदीच्या काठावर साई नो कवारा नावाच्या ठिकाणी मूर्तीच्या स्वरुपात स्थापित केले जाते. तसेच लोक येथे स्वत:चे दु:ख आणि पश्चाताप देखील व्यक्त करतात.
या मूर्तींना बोधिसत्व जिजोचे स्वरुप मानले जाते. अनुष्ठानात त्यांना प्रसाद अर्पण केला जाते. तसेच लाल रंगाचे कपडेही परिधान केले जातात. बोधिसत्व जिओ एक देवता असून ती मृत भ्रूण आणि मुलांना परलोकांना नेत असल्याचे मानले जाते. बोधिसत्व जिजो यांना मुलांचे संरक्षक ठरविले जाते. ते या मृत मुलांवर नजर ठेवतात आणि त्यांना राक्षसांपासून वाचवितात तसेच स्वत:सोबत त्यांची स्वर्गाची यात्रा घडवून आणण्यास मदत करत असल्याची मान्यता आहे. जपान व्यतिरिक्त अन्यत्र कुठेच अशाप्रकारचा अनुष्ठान केला जात नाही.