जगात सर्वात जास्त झाडे रशियात!
आकडा ऐकून व्हाल थक्क, झाडांची संख्या 641 अब्ज
जगभर झाडे तोडली जात आहेत. घरांसाठी आणि आपल्या सुविधांसाठी जंगले तोडल्याने पर्यावरणावर परिणाम होत असल्यामुळे सध्या अनेक देशांना हवामान बदलाचा धोका आहे. तर जगात सर्वात जास्त झाडे असलेला एक देश देखील आहे. या देशात झाडांची संख्या एवढी आहे की, त्याबद्दल जाणून घेतल्यावर कोणालाही धक्का बसेल.
जगात सर्वाधिक झाडे कोणत्या देशात आहेत, असा प्रश्न जेव्हाही येतो तेव्हा थेट रशियाचे नाव आपल्या मनात येते. रशिया जगातील सर्वात जास्त वृक्षांसाठी ओळखला जातो. या देशात झाडांची संख्या 641 अब्ज आहे. जे जगातील सर्वोच्च आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. त्याचे क्षेत्रफळ भारताच्या 5 पटीने जास्त आहे. रशियाचे क्षेत्रफळ 17,125,191 किमी असून वनक्षेत्र अंदाजे 8,249,300 चौरस किमीमध्ये पसरलेले आहे. या देशातील एकूण जमिनीपैकी सुमारे 45 टक्के जमीन जंगलांनी व्यापलेली आहे.
जगात सर्वाधिक झाडे असलेला दुसरा देश
या यादीत कॅनडाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. पॅनडाच्या वनक्षेत्राचे एकूण आकारमान अंदाजे 4,916,438 चौरस किमी आहे. हे देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे 30 टक्के क्षेत्र व्यापते. तर ब्राझीलचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. अॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट असून त्याचा सुमारे 60 टक्के भाग ब्राझीलमध्ये आहे. त्यामुळेच ब्राझीलमध्ये सुमारे 4,776,980 चौरस किमी इतके मोठे वनक्षेत्र आहे. हे क्षेत्र देशाच्या एकूण भूभागाच्या 56 टक्के आहे. याच कारणामुळे या यादीत ब्राझीलचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.