For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतातील सर्वात भीतीदायक-रहस्यमय ठिकाण

06:45 AM Jul 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतातील सर्वात भीतीदायक रहस्यमय ठिकाण
Advertisement

इतिहास कळल्यावर उडणार थरकाप

Advertisement

देवभूमी नावाने विख्यात उत्तराखंडमध्ये अनेक पवित्र स्थान असून येथे दरवर्षी लाखेंच्या संख्येत भाविक येत असतात. तर दुसरीकडे या पवित्र भूमीत भारतातील सर्वात भीतीदायक ठिकाणही आहे. हे स्थान चंपावत जिल्ह्यातील लोहाघाट येथे आहे. येथेच मुक्ती कोठरी नावाने एक भुताटकीयुक्त बंगला असून त्याच्या आसपासच्या भागाला भारताच्या सर्वात हॉरर ठिकाणांमध्ये सामील केले जाते.

या परिसरातून चित्रविचित्र आवाज ऐकू येतात असे आसपास राहणाऱ्या लोकांचे सांगणे आहे. याचमुळे कुठलाही स्थानिक व्यक्ती मुक्ती कोठरीच्या नजीक जाण्याचे धाडस करत नाही. मागील काही वर्षांदरम्यान या ठिकाणी अनेक रहस्यमय घटना घडल्या आहेत.

Advertisement

प्रारंभिक काळात या बंगल्यात एक ब्रिटिश कुटुंब राहत होते. नंतर या ब्रिटिश कुटुंबाने हा बंगला एक रुग्णालय स्थापन करण्यासाठी दान केला होता. हा बंगला रुग्णालयात रुपांतरित झाल्यावर अत्यंत लोकप्रिय झाला. अनेक लोक येथे उपचारासाठी येत होते. परंतु अचानक एक नवा डॉक्टर येताच सर्वकाही बदलून गेले. हा डॉक्टर रुग्णांना पाहिल्यावर त्यांचा मृत्यू कधी होणार से माहित असल्याचा दावा करायचा. तसेच डॉक्टराच्या भविष्यवाणीनुसारच रुग्णाचा मृत्यू त्याच दिवशी आणि त्याचवेळेला व्हायचा. स्थानिक लोकांनुसार डॉक्टर या रुग्णांना  एका गुप्त खोलीत (मुक्ती कोठरी) नेत मारून टाकायचा.

डॉक्टरने स्वत:च्या भविष्यवाणीला खरे ठरविण्यासाठी ज्या रुग्णांची हय्त्या केली, त्यांचे आत्मे आजही मुक्तीत कोठरीत भटकत असल्याचे बोलले जाते. याचमुळे आजही कुठलाही व्यक्ती या ठिकाणाच्या आसपास जाण्याची हिंमत करत नाही. स्थानिक लोकांनुसार येथे अनेक रहस्यमय घटना घडत असतात.

Advertisement
Tags :

.