For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जगातील सर्वात शक्तिशाली गरुड

06:22 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात शक्तिशाली गरुड
Advertisement

7 फूटांचे पंख, अस्वलासारखे पंजे

Advertisement

दक्षिण आणि मध्य अमेरिकेच्या घनदाट वर्षावनांमध्ये एक असे गरुड असते जे स्वत:ची शक्ती आणि मोठ्या पंजांसाठी ओळखले जाते. याचे नाव हार्पी ईगल आहे. याचे शास्त्राrय नाव हार्पिया हार्पिजा आहे. हे झाडांच्या उंच फांद्यांदमयान राहते आणि माकड, स्लॉथ यासारख्या प्राण्यांची शिकार करते. याला जगातील सर्वात मोठे अन् शक्तिशाली गरुड मानले जाते.

हार्पी ईगलची सर्वात खास गोष्ट त्याचे पाय अन् पंजे आहेत. याचे  पंजे सुमारे 3-4 इंच म्हणजेच 7.5-10 सेंटीमीटरपर्यंत लांब असू शकतात. याचे पंजे अत्यंत मोठे अन् मजबूत असतात. मादी हार्पी ईगल नरापेक्षा मोठी असते आणि याचे वजन सुमारे 20 पाउंड म्हणजेच जवळपास 9 किलोपर्यंत पोहोचू शकते. याच्या पंखांचा फैलाव सुमारे 6-7 फुटांपर्यंत असू शकतो.

Advertisement

झाडांदरम्यान सहजपणे उड्डाण

हार्पी ईगल खुल्या आकाशात दीर्घ अंतरापर्यंत उ•ाण करण्याऐवजी जंगलाच्या कॅनोपीदरम्यान उडतो. याचे पंख अत्यंत लांब नसतात, याचे शेपूट लांब असते. यामुळे याला झाडे अन् फांद्यांदरम्यान वेगाने दिशा बदलण्यास मदत मिळते. हार्पी ईगल अनेकदा उंच झाडावर बसून आसपास पाहत राहते. शिकारावर नजर पडताच हे झाडांमधून वेगाने खाली जाते. घनदाट जंगलात अशाप्रकारे शिकार करण्यासाठी याच्या शरीराची रचना अत्यंत सहाय्यभूत ठरते. हार्पी ईगल बहुतांशकरून झाडांवर राहणाऱ्या प्राण्यांना स्वत:ची शिकार करतो. माकड आणि स्लॉथ याचे प्रमुख शिकार आहेत. याचबरोबर इगुआना, पोपट, पॉक्यूपाइन आणि इतर छोटे प्राणी देखील याच्या आहारात सामील असू शकतात.

याचे मजबूत पाय आणि मोठे पंजे शिकार पकडण्यास याची मदत करतात. द पेरेग्रीन फंडनुसार हार्पी ईगल 15 पाउंडपेक्षा अधिक वजनाच्या शिकारालाही उचलू शकतात. काही प्रकरणांमध्ये हे स्वत:च्या वजनाच्या जवळपास वजन असलेल्या शिकारालाही उचलून नेताना दिसून आले आहेत.

दरदिनी शिकार नाही

हार्पी ईगलला दरदिनी शिकार करावी लागत नाही. एकदा मोठी शिकार मिळाल्यावर तो अनेक दिवसांपर्यंत ते खाऊ शकतो. हा पक्षी एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळापर्यंत आहाराशिवाय राहू शकतो. हा दिवसा अधिक सक्री असतो. उर्वरित वेळ उंच झाडांवर बसून आसपास नजर ठेवतो. याचे डोळे अत्यंत तीव्र असतात, ज्यामुळे तो झाडांदरम्यान लपलेली शिकारही पाहू शकतो.

मोठ्या झाडांची आवश्यकता

हार्पी ईगलचे जीवन घनदाट वर्षावनांशी निगडित आहे. या पक्ष्याला राहणे अन् घरटे तयार करण्यासाठी मोठ्या झाडांची आवश्यकता असते. जंगलतोड होत असल्याने याच्यासाठी मोठी समस्या निर्माण होतेय. मध्य अमेरिकेच्या अनेक हिस्स्यांमध्ये या पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. काही ठिकाणांहून हा पक्षी पूर्णपणे गायब झाला आहे. जंगल कमी झाल्याने याच्यासाठी शिकार आणि घरटे तयार करण्यासाठी जागा दोन्ही कमी होतात.

वर्षावनांसाठी आवश्यक

हार्पी ईगल वर्षावनांच्या अन्नसाखळीचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. हा माकड अन् स्लॉथ यासारख्या प्राण्यांची शिकार करतो. अशाप्रकारे हा जंगलात वेगवेगळ्या प्राण्यांच्या संख्येला संतुलित राखण्यात भूमिका बजावत असतो. सुमारे 50 पाउंडपर्यंत वजन, 6-7 फूटांपर्यंत पंखांचा फैलाव आणि मजबूत पंजे असलेला हार्पी ईगल वर्षावनांमधील एक मोठा शिकारी आहे. याचे वैशिष्ट्या केवळ याचा मोठा आकार नाही, तर झाडांमधून उडत वेगाने शिकार पकडण्याची क्षमता देखील आहे.

Advertisement
Tags :

.