सर्वात शक्तिशाली क्रेडिट कार्ड
कुठलीच नाही मर्यादा, अब्जावधींचे शॉपिंग करता येणार
सद्यकाळात अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. प्रत्येक क्रेडिट कार्डची एक मर्यादा असते. बँक संबंधिताच्या खात्याच्या हिशेबानुसार मर्यादायुक्त क्रेडिट कार्ड पुरवत असते. परंतु जगात एक असे क्रेडिट कार्ड आहे, ज्याला कुठलीच मर्यादा नाही. जगातील या सर्वात शक्तिशाली क्रेडिट कार्डचे नाव सेंच्युरियन कार्ड असून ते अमेरिकन एक्स्प्रेस कंपनीचे आहे. ज्याला सर्वसाधारण भाषेत अमेक्स ब्लॅक कार्डही म्हटले जाते. या कार्डचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे यात कुठलीच पूर्वनिर्धारित व्रेडिट लिमिट नसते. म्हणजे या कार्डद्वारे अब्जावधी रुपयांचे शॉपिंग करता येऊ शकते.
हे कार्ड संबंधिताला अमर्यादित शॉपिंगची शक्ती देते, परंतु ते मिळविणे सोपे नाही. हे कार्ड केवळ इन्विटेशनवरच मिळते. अमेरिकन एक्स्प्रेस स्वत: हे कार्ड कुणाला द्यायचे, याचा निर्णय घेते. सेंच्युरियन कार्डची सुरुवात 1999 साली झाली होती. प्रारंभी याला एक मिथ्याप्रमाणे पाहिले जात होते. केवळ काही निवडक लोक म्हणजेच ब्रुनेईचे सुल्तान किंवा अमेक्चे सीईओच हे कार्ड बाळगत होते. आजही हे कार्ड जगभरात एक्सक्लूसिव्ह मानले जाते. पूर्ण जगात या कार्डचे 1 लाखापेक्षा कमी धारक आहेत आणि अमेरिकेतही 20 हजारांच्या आसपास लोकच याचा वापर करतात.
भारतात निवडक वापरकर्ते
या कार्डचे वापरकर्ते भारतात कमी संख्येत आहेत. बहुधा हजारापेक्षा कमी लोक याचा वापर करत असावेत. हे कार्ड मिळविण्यासाठी कुठलीच सामान्य अर्ज प्रक्रिया नाही. अमेरिकन एक्स्प्रेसकडे संबंधितांचा मागील खर्च तपशील असायला हवा. अमेरिकन एक्स्प्रेस प्लॅटिनम कार्डवर वार्षिक कमीतकमी 3.5 लाख ते 5 लाख डॉलर्स (सुमारे 3-4 कोटी रुपये) खर्च करावे लागतात आणि ते देखील वेळेत भरावे लागतात. याचबरोबर क्रेडिट स्कोर चांगला असावा, नेट वर्थ खूपच अधिक असावी आणि अमेक्ससोबत दीर्घ नाते असणे आवश्यक आहे. कधीकधी अमेक्सच्या वेबसाइडवर रिक्वेस्ट इन्वाइट फॉर्म भरता येतो, परंतु मंजुरी पूर्णपणे अमेक्सच्या हातात आहे. या कार्डची सर्वात मोठी शक्ती याची ‘नो प्री-सेट व्रेडिट लिमिट’ आहे. याचा अर्थ कितीही खर्च करता येतो. अमेक्स दर महिन्याला संबंधिताच्या खर्चाच्या पॅटर्ननुसार मर्यादा निश्चित करते. मोठमोठे श्रीमंत लोक याच्या माध्यमातून प्रायव्हेट जेट, आलिशान कार्स, हिरे तसेच महागड्या घरांची खरेदी करत असतात.