सर्वात विषारी मासा
थेंबभर विषाने नष्ट करू शकतो शहर
खाण्यापिण्याचे शौकीन असलेल्या लोकांना मासे खाणे पसंत असते. विशेषकरून सी-फूड शौकिनांना वेगवेगळ्या माशांच्या माहिती असते. परंतु अनेकदा संबंधितांकडून चूक होते आणि मासे जीवघेणे ठरू शकतात. एक असा मासा आहे, जो इतरांचे भोजन ठरत नाही, तर स्वत:च्या विषाद्वारे भल्याभल्या लोकांना मृत्युच्या दारात लोटू शकतो. या माशाचा स्पर्शही संबंधिताचा जीव घेऊ शकतो. या माशाचे नाव स्टोनफिश असून त्याला हे नाव त्याच्या लुकमुळे मिळाले आहे, कारण हा दिसण्यासाठी दगडासारखा आहे.
स्टोनफिश हा जगातील सर्वात विषारी मासा आहे. या माशाला स्पर्श केला तरीही जीव संकटात सापडू शकतो. दगडासारखा दिसत असल्याने लोकांना त्याची ओळख पटविता येत नाही आणि ते याचे शिकार ठरतात. याच्या शरीरातून निघणाऱ्या विषामुळे कुणाचाही मृत्यू ओढवू शकतो. स्टोनफिशच्या शरीरातून न्यूरोटॉक्सिन नावाचे विष बाहेर पडते, जे लोकांच्या मृत्यूचे कारण ठरते.
तज्ञांनुसार या माशाच्या विषाच्या संपर्कात येणाऱ्याचा मृत्यू निश्चित आहे. यापासून वाचण्याचा एकच उपाय असून लवकरात लवकर संबंधित हिस्सा कापणेच योग्य मानले जाते. याच्या विषाचा वेग देखील अत्यंत अधिक असते. केवळ 0.5 सेकंदात याच्या शरीरातून विष बाहेर पडते. जर एखाद्या शहराच्या पाण्याच्या टाकीत स्टोनफिशचे विष मिसळले तर शहरातील सर्व लोकांचा मृत्यू ओढवू शकतो.